Pune Sinhagad Road Firing Case | पुण्यात गोळीबाराचे सत्र सुरुच, सिंहगड रोड परिसरात पहाटे गोळीबार; दोन दिवसातील तिसरी घटना (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad Road Firing Case | पुण्यात दोन दिवसांत गोळीबारीच्या तीन घटना घडल्या आहेत. एका बांधकाम व्यावसायिकावर (Firing On Builder) दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला. तर शेवाळवाडी हडपसर (Shewalwadi Hadapsar) येथे व्यवसायीक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळी झाडली. या दोन घटना ताज्या असतानाच आज (गुरुवारी) पहाटे सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Shinhagad Road Police Station) हद्दीतील भुमकर चौक (Bhumkar Chowk) परिसरात पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.(Pune Sinhagad Road Firing Case)

गणेश गायकवाड (रा.वारजे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माचीस मागितल्याच्या कारणावरुन हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रात्री एक वाजता दारु घेण्यासाठी नवले ब्रिज येथे चैतन्य बार ठिकाणी आला होता. त्यावेळी त्या ठिकाणी आरोपीही जमले होते. त्याने सहज माचीस आहे का? अशी विचारणा केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. याच वादातून आरोपीने गोळी झाडली. गायकवाड याच्या खांद्याला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी पिस्तुल, बंदूक बाळगल्या प्रकरणी
गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयात परेड घेतली होती.
100 अधिक जणांनी आयुक्तालयात हजेरी लावली होती. त्यानंतर देखील शहरामध्ये गोळीबारीच्या सलग घटना घडू लागल्या आहेत.

पोलिसांनी गुन्हेगारांची परेड घेतल्यानंतर बुधवारी सकाळी शेवाळवाडी परिसरात सिक्युरिटी एजन्सीला लागणारे सुरक्षा
रक्षक पळवण्याच्या आणि एकाच भागातील काम घेण्याच्या वादामधून गोळीबार करण्यात आला.
एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळी झाडली.
तर मंगळवारी दुपारी जंगली महाराज रोडवर एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला.
पिस्तुलातून गोळी न सुटल्याने बांधकाम व्यावसायिक थोडक्यात बचावले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक