Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | रविवारी पहाटे मुंबई शहराच्या विमानतळाबाहेर (Domestic Airport Mumbai) नंबर प्लेट नसलेल्या BMW मधून पाच जिवंत काडतुसे व अमेरिकन बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी कार मालक आणि पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे Tushar Kale (वय-41), सचिन पोटे (44), आकाश शिंदे (28) यांना शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.(Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport)

पोलिसांनी तुषार काळे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीकडून पिस्टल विकत घेतले. रविवारी पहाटे 2.50 च्या सुमारास विमानतळाजवळील मल्टी लेव्हल कार पार्कींमध्ये नंबर प्लेट नसलेले वाहन पाहून सुरक्षा अधिकारी सतीश पाशिलकर व अक्षय गोटेकर यांना संशय आला. त्यांनी कारची झडती घेतली. पोलिसांना कारच्या ग्लोव्ह बॉक्समध्ये यूएस बनावटीचे 7.65 कॅलिबरचे पिस्तूल आढळून आले ज्यामध्ये 77.65 एमएमचे पाच जिवंत काडतुसे होती.

परिमंडळ (झोन) 8 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम (DCP Dikshit Gedam) यांनी सांगितले की, दोन सुरक्षा अधिकाऱ्यांना विमानतळावर एक BMW कारमध्ये पाच गोळ्या असलेले यूएस बनावटीचे पिस्टल सापडले. वाहन परवाना प्लेट शिवाय पार्किंगच्या ठिकाणी नेले जात होते. त्यानंतर त्यांनी याबद्दल विमानतळ पोलिसांना (Mumbai Airport Police) कल्पना दिली. आम्ही अटक केलेल्या पुण्यातील तुषार काळे हा मुंबईत कशासाठी आला होता याचा तपास करत आहोत.

रविवारी वांद्रे येथे अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता.
या घटनेशी काळे याचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीला आला होता.
त्यामुळे अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकारी व गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात भेट दिली.
आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासात सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाशी काळे याचा
संबंध नसल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान काळे याने पोलिसांना सांगितले की, तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे.

दरम्यान, काळे याच्याकडे असलेल्या बॅगेत 38 हजार रुपयांची रोकड मिळाली आहे.
त्याने सांगितले की, हे पिस्तूल यूपीमधील एका व्यक्तीकडून खरेदी केले आहे.
पुण्यातील त्याच्या मित्रांना आणि इतरांना दाखवण्यासाठी त्याने पिस्टल कारमध्ये ठेवले होते.
त्याने नुकतीच कार खरेदी केली असून त्याला नोंदणी क्रमांक देखील मिळाला आहे.
परंतु, तो फॅन्सी नंबर असलेली नंबर प्लेट तयार करण्यासाठी दिली असून अद्याप ती मिळालेली नाही,
असंही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला
अटक यांना अटक करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NIBM Road Kondhwa Crime | पुणे : गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा, पोलीस अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल फोडला

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा अजितदादांवर पुन्हा घणाघात, ”ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, 2019 पासून भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग”

Sharad Pawar On Datta Bharne | शरद पवारांची दत्ता भरणेंवर सडकून टीका, ”इथं एकाला निवडून आणलं, तिकीट दिलं, मंत्री केलं, पण…”