Pune Smart City – ATMS System: पुणे स्मार्ट सिटीची ATMS यंत्रणा सलग दुसऱ्या दिवशी बंद पडल्याने वाहतुकीचा बोजवारा; 150 कोटी रुपये पाण्यात?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Smart City – ATMS System: वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्चून शहरातील 85 चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या ‘ आयटीएमएस ‘ यंत्रणेने सलग दुसऱ्या दिवशी दगा दिल्याने पुणेकरांना मनस्ताप सोसावा लागला. प्रामुख्याने सातारा रस्ता , स्वारगेट, दांडेकर पूल, पर्वती, महर्षी नगर परिसर लाखो नागरिकांना कोंडीचा त्रास सोसावा लागला. (Pune Smart City – ATMS System)

       शहरातील वाहतूक सुरळीत आणि गतिमान व्हावी यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 125 चौकांमध्ये अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसविण्यात येत आहे. आतापर्यंत 85 चौकातील कामे झाली आहेत. सिंगनल्स मध्ये असलेल्या सेन्सरच्या माध्यमातून गर्दीच्या रस्त्यावरील सिग्नलची वेळ ऑटोमॅटिक बदलेल, तसेच एकाच रस्त्यावरील सिग्नल पाठोपाठ सुटणार ज्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक गतिमान होईल, अशी रचना आहे. यामुळे वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या देखील कमी होईल, असाही फायदा सांगितला गेला आहे. या यंत्रणेच्या 5 वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने 58 कोटी रुपये मोजले आहेत. (Pune Smart City – ATMS System)

        परंतु जेवढी अत्याधुनिक यंत्रणा तितकेच तिचे तोटे  देखील असल्याचा अनुभव सलग दुसऱ्या दिवशी पुणेकरांना आला. प्रामुख्याने दक्षिण पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना लाखो नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. सिग्नल बंद पडल्याने बहुतांश रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

  शास्त्री रस्ता, दांडेकर पूल, सानेगुरुजी नगर, सारसबाग, पर्वती, टिळक रस्ता, स्वारगेट, शिवदर्शन, सहकार नगर, सातारा रस्ता परिसरात अभूतपूर्व कोंडी झाली होती. नवी पेठेतून दुचाकीने कात्रज कडे जाणारे एक ते दीड तास तर चार चाकीने जाणारे नागरिक दीड ते दोन तास कोंडीत सापडले होते. संध्याकाळी उशिरा घरी परतणाऱ्यांनी तर शिव्यांची लाखोली वाहिली.

         एटीएमएस यंत्रणेमुळे चौकांमधील वाहतुक पोलिसांची संख्या अलीकडे रोडावली आहे. त्यामुळे ऐनवेळी पाचारण कराव्या लागलेल्या पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.

           शुक्रवारी ( दि. 4) संध्याकाळी देखील 8 वाजण्याच्या सुमारास ही यंत्रणा बंद पडली होती. त्यावेळी देखील वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. मध्यवर्ती शहरात सण, उत्सव, मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. परंतु शुक्रवारी व शनिवारी असे कुठलेही कारण नसताना अभूतपूर्व कोंडीचा सामना करावा लागला आहे.. नागरिकांच्या करातून सुमारे 150 कोटी रुपये खर्चूनही मनःस्ताप आणि प्रदूषणाशिवाय काहीच हाती लागलेले नाही, हे या यंत्रणेतून दिसून आले आहे. त्यामुळे ही यंत्रणा नेमकी कशासाठी, कोणाच्या हट्टापायी बसविण्यात आली ? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत.

ATMS यंत्रणा बसवण्यासाठी जुने खांब व दिवे काढून नवीन अत्याधुनिक सिग्नल बसवले आहेत.
यासाठीची केबल टाकण्यासाठी सर्वच चौकांमध्ये खोदाई करण्यात आली आहे.
या खोदाई नंतर खड्डे बुजवण्याचे काम हे तकलादू करण्यात आले आहे.
पावसाळ्यात याठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी उंचवटे निर्माण झाले आहेत.
यामुळे वाहतुकीची गती वाढण्याऐवजी गती कमी झाली असून दुचाकीस्वाराना पाठीच्या दुखण्यासाठी आणखी एक
कारण तयार झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Desai Suicide Case | कंपनी बँकेच्या नियमांना धरुन चालत नाही, सत्यजित तांबेंचं ट्विट चर्चेत

Scam 2003 Teaser Out | स्कॅम 1992 चा सिक्विल येणार; स्कॅम 2003 चा जबरदस्त टीझर आऊट