Pune Swargate Crime | रिक्षा चालकावर पालघनने वार, स्वारगेट पोलिसांनी ‘भाई’ला ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Swargate Crime | मुलाच्या अंगावर चुना उडवल्याचा जाब विचारणाऱ्या रिक्षा चालकाला ‘मी इथला भाई आहे’ म्हणत पालघनने वार करुन जखमी केले. ही घटना स्वारगेट एसटी स्टँड परिसरातील साई रिक्षा स्टँडजवळ गुरुवारी (दि.29) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एका भाईच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत शब्बीर बाबू शेख (वय-49 रा. एकबोटे कॉलनी, लोहिया नगर, घोरपडी पेठ, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन साहील गणेश वायदंडे (वय-24), किरण गोविंद गोरे (वय-27) यांच्यावर आयपीसी 326, 324, 504, 506(2), 34 नुसार गुन्हा दाखल करुन किरण गोरे याला अटक केली आहे.(Pune Swargate Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा साहील याच्या अंगावर आरोपींनी चुना उडवला.
याचा जाब विचारला असता आरोपीने ‘मी इथला भाई आहे, मी असच करणार. तुला काय उखडायचे ते उखड.
तुझी रिक्षा इथ लावयाची नाही’ असे म्हणत फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
शब्बीर शेख आरोपींना समजून सांगत असताना आरोपींनी लोखंडी पालघनने वार करुन जखमी केली.
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या किरण शहा यांच्या हातावर पालघन लागल्याने ते देखील जखमी झाले.
आरोपींनी हातातील पालघन हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sanjay Gaikwad | शिंदे गटाच्या आमदाराने पोलिसाच्या काठीनेच युवकाला बदडले, शिवजयंती मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल

Pune Murder Case | जुन्या वादातून बेदम मारहाण करुन ज्येष्ठ नागरिकाचा खून, दोघांना अटक; सहकारनगर परिसरातील घटना

Shikhar Bank Scam Case | अजितदादा सत्तेत इन, तपास आऊट, शिखर बँक घोटाळ्याचा तपास बंद करा; पोलिसांची कोर्टाला विनंती

Dabholkar Murder Case | डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी ‘सनातन’च्या राष्ट्रीय प्रवक्त्यांचे महत्वाचे वक्तव्य, ”आम्हाला अडकवण्याचा…”

Pune Mundhwa Police | दुचाकीस्वाराला भररस्त्यात मारहाण करुन लुटले, दोघांना मुंढवा पोलिसांकडून अटक

BJP-Shivsena Seat Sharing In Lok Sabha Elections | जागावाटपावरून महायुतीत तणाव, शिंदे गटाचा संताप, सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय?

Pune Lonavala Mega Block | पुणे – लोणावळा लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक, जाणून घ्या रद्द झालेल्या गाड्यांची यादी