Pune Swargate Crime | पुणे : उत्तेजक इंजेक्शन विक्री प्रकरणी तरुणीला अटक, 46 बाटल्या जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Swargate Crime | उत्तेजक इंजेक्शन विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका तरुणीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. तर व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून इंजेक्शनच्या 46 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि.15) सायंकाळी सहाच्या सुमारास स्वारगेट येथील सोलापूर एसटी स्टँड (Solapur ST Stand) येथे केली.

याबाबत पोलीस अंमलदार प्रविण बाळासाहेब गोडसे (वय-31) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन निकिता शशीकांत जाधव (रा. सह्याद्री हॉस्पीटल जवळ, बिबवेवाडी गावठान, पुणे) व दोन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 276, 336, 328, 34 नुसार गुन्हा दाखल करुन निकिता जाधव हिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निकिता हिने तिच्या नावावर 15 हजार 400 रुपयांच्या मेफेनटरमाइन इंजेक्शन आयपी (Mephentermine Injection IP) 46 बाटल्या मागवल्या होत्या. तिने या बाटल्या दोन अल्पवयीन मुलांना विक्री करण्यासाठी दिल्या होत्या. आरोपींकडे इंजेक्शन खरेदी केलेल्या बाटल्यांचे खरेदी केलेले बिल नव्हते. या इंजेक्शनचे दुष्परिणाम होऊन, इंजेक्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका किंवा आरोग्याला गंभीर इजा होऊ शकते, हे माहित असताना आरोपींनी मेफेनटरमाइन इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगताना पकडण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांचे थेट उत्तर; ”हा लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतो”

भांडण सोडवल्याच्या रागातून तरुणीला लोखंडी रॉडने मारहाण, चंदननगर परिसरातील प्रकार

पुणे : पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून मारहाण करुन महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR

दरोड्याच्या तयारीतील टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, कोयते जप्त

Pune Police News | पुणे : महिला पोलीस शिपाई तडकाफडकी निलंबित

पुणे : पाठलाग करुन महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

बांधकाम व्यावसायिकाला धमकावून बेकायदा फ्लॅट बळकावले; शरद बारणे आणि बाळासाहेब बारणेंच्या विरूध्द गुन्हा दाखल