Pune Traffic Updates | मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल, जणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मराठा आरक्षण मोर्चा (Maratha Reservation March) मंगळवारी (दि.23) रांजणगाव येथून निघणार आहे. हा मोर्चा कोरेगाव भिमा मार्गे चोखीदाणी, खराडी येथे मुक्कामी असणार आहे. तर बुधवारी (दि.24) चौखीदाणी खराडी येथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव वाहनांसह सहभागी होणार आहेत. यापर्श्वभूमीवर या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने (Pune Traffic Updates) वळवण्यात आली असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांनी केले आहे.

मंगळवार (दि. 23 जानेवारी) मराठा आरक्षण मोर्चा रांजणगाव येथून निघून नगर रोडने कोरेगाव भिमा मार्गे चोखीदाणी, खराडी येथे मुक्कामी थांबणार आहे. मंगळवारी दुपारी तीन पासून आवश्यकतेप्रमाणे अहमदनगर कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालील प्रमाणे वळविण्यात येणार आहे.

  • मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन तसेच कोल्हापूर, सातारा येथुन अहमदनगर कडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज-खडी मशिन चौक-मंतरवाडी फाटा-हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगांव-चौफुला-नाव्हरे-शिरूर मार्गे जातील.
  • वाघोली, लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून केडगाव चौफुला-नाव्हरा मार्गे शिरूर मार्गे जातील.
  • पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौक-डावीकडे वळण घेऊन सोलापूर रोडने यवत-केडगाव चौफुला-नाव्हरे-शिरूर मार्गे जातील

मंगळवारी (दि.23) मराठा आरक्षण मोर्चा चोखीदाणी, खराडी परिसरामध्ये मुक्कामी राहणार आहे व पुढे बुधवारी (दि.24) पुणे शहरामधुन पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व प्रकारची वाहतूक बुधवारी आवश्यकते प्रमाणे खालीलप्रमाणे वळवण्यात येईल.

  • अहमदनगर कडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथुन केसनंद-थेऊर मार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील.
  • वाघोरी परिसरामधील वाहने वाघोली-आव्हाळवाडी-मांजरी खुर्द-मांजरी बुद्रुक-केशवनगर- मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील.
  • पुणे शहरामधुन अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी-धानोरी-लोहगाव-वाघोली मार्गे अहमदनगरकडे अशी वळविण्यात येईल.

मराठा आरक्षण मोर्चा जसजसा पुढे मार्गस्थ होईल. त्याप्रमाणे मोर्चाचे मागील वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kharadi Geetanjali Salon | गीतांजली सलूनचे पुण्यातील खराडी येथे दुसरे आलिशान आउटलेटचे उद्घाटन

Pune News | रामलल्लांच्या प्रथम दर्शनाने चंद्रकांत पाटील भावूक ! जीवन सार्थक झाल्याचे नामदार पाटील यांचे भावनिक उद्गार (Video)