Pune Wakad Crime | भाजीपाला विकल्याप्रमाणे वाकडमधील म्हातोबानगरात विकला जातो गांजा; विक्रेत्या चार महिलांसह सहा महिलांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Wakad Crime | प्रत्येक वाड्यावस्ती, उपनगरात रस्त्याच्या कडेला महिला पुरुष भाजीपाला विकत असत. पण, वाकडमधील म्हातोबानगरची गोष्टच वेगळी. तेथे रस्त्याच्या कडेला भाजीपाल्याप्रमाणे गांजा (Ganja) विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell Pimpri) चार महिलांना अटक करुन त्यांच्याकडून १ लाख १ हजार रुपयांचा १ किलो ४३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्यांचा गांजा पुरविणार्‍या पिंपरीतील भाटनगर येथील दोघा महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थाच्या विक्रीत एकाचवेळी चार महिलांना पकडण्याची ही पहिली वेळ आहे. (Pune Wakad Crime)

याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई मितेश यादव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६२/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोनिका राजेंद्र वाडघरे, हर्षदा कृष्णा राऊत, गिता मुकेश यादव, माला अनिल गुंजाळ (सर्व रा. कृष्णा स्वीट होमसमोर, म्हातोबानगर, वाकड) आणि गिता मलकेकर, रेखा तामचीकर (रा. भाटनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पेट्रोलिग करत वाकडमधील म्हातोबानगर झोपडपट्टीत आले होते. कृष्णा स्वीट होम येथे त्यांची गाडी आली. तेव्हा तेथे बसलेल्या चार महिला अचानक त्यांची गाडी पाहून निघून आत झोपडपट्टीमध्ये जाऊ लागल्या. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या महिलांना थांबविले. त्यांच्याकडील नायलॉनच्या पिशवीत काय आहे. पोलिसांची गाडी पाहून का पळून चालला असे विचारल्यावर त्या गडबडून गेल्या. त्यांच्या नायलॉनच्या पिशवीची झडती घेतल्यावर त्यात गांजा आढळून आला. मोनिका वाडघरे हिच्याकडे ३५० ग्रॅम गांजा, हर्षदा राऊत हिच्याकडे ३६० ग्रॅम गांजा, गिता यादव हिच्याकडे ३४५ ग्रॅम गांजा आणि माला गुंजाळ हिच्याकडे ३७५ ग्रॅम गांजा आढळून आला. रस्त्याच्या कडेला बसून त्या गांजांची विक्री करत होत्या.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी पिंपरीतील भाटनगरमधील गिता मलकेकर व रेखा तामचीकर यांच्याकडून गांजा
आणला असल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वांवर एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यवंशी तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan | खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Sunny Vinayak Nimhan | माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सुपर सनी विक क्रिडा महोत्सवाचे आयोजन

पुणे : सहायक फौजदारासह 2 पोलिस तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Pune PMC Property Tax | शहरातील तब्बल 19 हजार ओपन प्लॉटधारकांवर महापालिका ‘उदार’; 2000 कोटींच्या थकबाकीला ‘अभय’ देण्याच्या हालचाली