Sunny Vinayak Nimhan | माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सुपर सनी विक क्रिडा महोत्सवाचे आयोजन

पुणे : सोमेश्वर फौंडेशनच्यावतीने (Someshwar Foundation) माजी नगरसेवक सनी निम्हण (Sunny Nimhan) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुपर सनी विक या क्रिडा महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहीती फाऊंडेशनचे उमेश वाघ आणि प्रताप जाधव यांनी पत्रकार परीषदेत दिली.

यावेळी एव्हरेस्ट वीर किशोर धनकडे, किशोर बांदल आणि सोमेश्वर फाउंडेशनचे उमेश वाघ, बॉक्सिंग असोसिएशनचे मदन वाणी, तायक्वांदो या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या क्रिडा महोत्सवात जिल्हा स्तरीय तायक्वांदो, बॉक्सिंग, स्केटींग, पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल, भव्य डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहेत. सुपर सनी विक हा क्रिडा महोत्सव १७ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत पार पडेल.

बॉक्सिंग स्पर्धा १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान गोखले नगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदानावर पार पडेल. तायक्वांदो स्पर्धा शनिवार आणि रविवार दि. २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी हॉटेल सेंट्रल पार्क येथील भव्य हॉल मध्ये होईल. स्केटींग स्पर्धा रविवार २५ फेब्रुवारी रोजी रोडरेस प्रकारात सुस लिंकरोडवर पाार पडेल.भव्य डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा औंध येथील इंदीरा गांधी प्राथमिक शाळा मैदानावर दि २० ते २५ फेब्रुवारीदरम्यान पार पडतील. पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएसनच्या मान्यतेने विवध अंतराच्या पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फार अमृतकाल स्पर्धा रविवारी ता. २५ फेब्रुवारी रोजी होईल. ही स्पर्धा २१, १०, ५ आणि ३ किमी अंतराची असेल. महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामधून या स्पर्धेस सकाळी ५:३० वाजता सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत विक्रमी २१ हजारहुन अधिक नागरिकांनी या स्पर्धेमधील आपला सहभाग निश्चित केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : सहायक फौजदारासह 2 पोलिस तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण