Pune Wanwadi Crime | पुणे : ब्रेकअप केल्याने तरुणीला शिवीगाळ करुन धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Wanwadi Crime | इन्स्टाग्रामवर ओळख (Instagram Friend) झाल्यानंतर मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समजल्यानंतर तरुणीने त्याच्यासोबत ब्रेकअप केले. याचा राग आल्याने आरोपीने मुलीला व तिच्या घरच्यांना फोन करुन वारंवार शिवीगाळ करुन धमकी दिली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत घडला आहे.(Pune Wanwadi Crime)

याबाबत 20 वर्षाच्या तरुणीने सोमवारी (दि.25) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अर्जुन राठोड (रा. शिवनेरी नगर, कोंढवा, पुणे) याच्यावर आयपीसी 354(ड), 504,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी तरुणीची ओळख नोव्हेंबर 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यांच्यात मैत्री होऊन मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

दरम्यान, आरोपी अर्जुन हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती फिर्यादी यांना समजली.
त्यामुळे तरुणीने त्याच्या सोबत असलेले प्रेमसंबंध तोडले. याचा राग आल्याने आरोपीने तरुणीला व तिच्या घरच्यांना
फोन करुन वारंवार लग्नची मागणी करुन त्रास दिला. तसेच लग्न केले नाही तर बघून घेईन अशी धमकी देत शिवीगाळ
केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत ठाकरे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Vs Ajit Pawar NCP | तटकरेंचा कडेलोट केला तर तुम्हाला विधानसभा निवडणुकीत हत्तीच्या पायी तुडवू, रायगडमध्ये महायुतीत वाद, मावळच्या निवडणुकीवर परिणाम होणार?

Shivajirao Adhalrao Patil | अजित पवार, वळसे-पाटलांच्या उपस्थितीत आज आढळराव राष्ट्रवादीत जाणार, महायुतीची मोठी खेळी! शरद पवारांना शह

Symbiosis Boys Hostel | पुणे : सिंम्बॉयसिस बॉईज होस्टेलमध्ये तरुणाच्या अंगावर अ‍ॅसिड सदृश रसायन फेकले

Pune Lonikand Crime | पुणे : धक्कादायक! तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी तरुणाला अटक