Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे शहरतील वारजे जलकेंद्र अख्यारीतील गांधी भवन टाकीवरील कोथरुड परिसर व चांदणी चौक (चौकोनी) टाकी वरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर बसवले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वरील पंपींगच्या अखत्यारीत येणाऱ्या भागाचा गुरुवारी (दि.29) पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.30) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा  होणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर

महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरुड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, प्रमतेश सोसायटी, डी.पी.रोड वरील भाग

चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसर

बावधन गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एनक्लेव्ह सोसायटी, विद्यानगर, पाषाण रोडवरील डावी, उजवी बाजू.

Web Title :- Pune Water Supply | Water supply to this area of Pune city will be closed on Thursday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | एकच सदनिका परस्पर विक्री प्रकरणी तक्रारींचे स्वरूप पाहून विशेष तपास पथक स्थापण्याचा निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’