Pune Yerawada Crime | पुणे : दारुच्या नशेत मित्राच्या छातीत भोसकला चाकू, आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Yerawada Crime | दारु पीऊन सोसायटीत आरडा ओरडा करणाऱ्या मित्राला शांत राहण्यास सांगितले. याचा राग आल्याने मित्रासोबत वाद घालून भाजी कापण्याचा चाकू मित्राच्या छातीत भोसकून गंभीर जखमी केले. याप्रकरणी आरोपीला येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.26) रात्री दीडच्या सुमारास कल्याणी नगर येथील मुळीक कॉम्प्लेक्सच्या (Mulik Complex Kalyani Nagar) पाचव्या मजल्यावर घडला.(Pune Yerawada Crime)

याबाबत प्रथमेश संजय कांबळे (वय-20 रा. मुळीक कॉम्प्लेक्स, रामवाडी जकात नाका, कल्याणी नगर, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तेजस उर्फ गणेश शंकर डोरके (वय-23 रा. मुळीक कॉम्प्लेक्स, रामवाडी) याच्यावर आयपीसी 326, 323 महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे मुळीक कॉम्प्लेक्सच्या सातव्या मजल्यावर राहतात. मंगळवारी रात्री ते दोघे दारु पिऊन ते इमारतीच्या परिसरात आले. आरोपी तेसज डोरके याने आरडा ओरडा करण्यास सुरवात केली. त्यावेळी इमारतीत राहत असलेल्या रॉबर्ट जडसन यांनी दोघांना आरडा ओरडा करु नका असे सांगितले. त्यामुळे प्रथमेश याने तेजसला शांत राहण्यास सांगून सातव्या मजल्यावर गेले.

त्याठिकाणी दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची होऊन वाद झाले.
त्यावेळी प्रथमेश याने पाचव्या मजल्यावर राहणारा मित्र निखिल याला फोन करुन तेजसला समजावून सांगण्यास
सांगितले असता त्याने दोघांना पाचव्या मजल्यावर येण्यास सांगितले. प्रथमेश निखिल याच्याकडे जात असताना आरोपी त्याच्या मागे आला. त्याने निखिलच्या घरासमोर प्रथमेश सोबत वाद घालून मारहाण केली. तसेच भाजी कापण्याचा चाकू प्रथमेशच्या बरगड्यात भोसकून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील (PSI Swapnil Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha Election 2024 | शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे ‘नाईलाजास्तव’ लादलेले उमेदवार ! अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागतो हे शरद पवार यांचे नेतृत्व सिद्ध करते – डॉ. अमोल कोल्हे

Shivsena UBT Loksabha Candidates | लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, मावळमधून संजोग वाघेरे, कोण आहेत ‘हे’ 17 उमेदवार?

Sanjay Raut On Mahayuti | महायुतीच्या नेत्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल, गुलाम, मांडलिक, आश्रितांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, वंचितबाबत म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट? धंगेकर-मोहोळ यांच्या समोर वसंत मोरे ठरू शकतात मोठे आव्हान, कारण…

Pune Crime Branch | केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्धवस्त; पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये मोठी कारवाई (Video)