Pune Yerawada Crime | मोक्का गुन्ह्यात चार महिने फरार असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Yerawada Crime | लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीला येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) बेड्या ठोकल्या आहेत. मोक्का कारवाई झाल्यानंतर आरोपी चार महिने फरार होता. ही कारवाई येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे करण्यात आली. इस्माईल मैनुद्दीन शेरीकर (वय- 21 रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकीसमोर, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Yerawada Police Arrest Criminal Who Abscond In MCOCA)

लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल आयपीसी 325, 324, 323,504, 506, 34 व मोक्का कायदा कलम 3(2),3(4) या गुन्ह्यातील फरार आरोपी इस्माईल शेरीकर हा लक्ष्मीनगर येरवडा येथे येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई नटराज सुतार व काशिनाथ गद्दे यांना माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून आरोपीला गेनबा मोझे शाळा, येरवडा येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त करीत आहेत.(Pune Yerawada Crime)

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 4 विजयकुमार मगर,
सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे अशालता खापरे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस अंमलदार तुषार खराडे, दत्ता शिंदे, किरण घुटे,
कैलास डुकरे, अमजद शेख, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, सुशांत भोसले यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray On BJP | राज ठाकरेंचा भाजपाला थेट सवाल, ”मोदींनी येऊन फुलं वाहिली, त्या अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकाचं काय झालं?”

पिंपरी : महिलेला मारहाण करुन सोन्याचे दागिने व मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक

Pimpri Chinchwad Police Inspectors Appointments | पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 13 पोलीस निरीक्षकांची नेमणूक