Raj Thackeray On BJP | राज ठाकरेंचा भाजपाला थेट सवाल, ”मोदींनी येऊन फुलं वाहिली, त्या अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकाचं काय झालं?”

नाशिक : Raj Thackeray On BJP | मनसेच्या विरोधात पक्ष राजकीय पक्षच नव्हे तर माध्यमातील काही मंडळीही आहेत. मनसे विषयाची सुरुवात करतो आणि शेवट करत नाही, असा आरोप केला गेला. पण असे एकही आंदोलन नाही, जे आम्ही अर्थवट सोडले. माध्यमं बाकी पक्षांना असे प्रश्न विचारत नाहीत. मग आता आम्ही त्या पक्षांना प्रश्न विचारतो. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक का झाले नाही? पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) येऊन फुले वाहिली होती, त्याचे पुढे काय झाले? असा थेट सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपाला केला आहे.

आज नाशिकमध्ये झालेल्या मनसेच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वच पक्षांवर टीका केली. भाजपा (BJP), काँग्रेस (Congress), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) त्यांनी हल्लाबोल केला.

राज ठाकरे म्हणाले, मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी आंदोलन सुरू केले. ठाकरे सरकारच्या काळात माझ्या १७ हजार कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या गेल्या आणि ते लोक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेत होते. त्या भोंग्यांचा मुस्लीम समाजालाही त्रास होतो. माझ्या हातात एकदा सरकार द्या, सगळे भोंगे एका दिवसात बंद करतो, मग बघू कुणाची हिंमत होते, परत सुरु करण्याची.(Raj Thackeray On BJP)

ते पुढे म्हणाले, माहिमच्या समुद्रातील दर्गा एका रात्रीत तोडायला लावला होता. आम्ही प्रार्थना करण्यास विरोध करत नाही. पण नको तिथे प्रार्थना करू नका. दर्गा पाडल्यानंतर मुस्लीम समाजाकडून प्रतिक्रिया आली नाही, कारण त्यांनाही माहीत होते की, हे अनधिकृत बांधकाम आहे.

भाजपावर टीका करताना कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, यश मिळविण्यासाठी संयम ठेवा.
मला माझ्या कडेवरती माझी मुले खेळवायची आहेत.
सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुले कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळवला जातोय. तसले सुख मला नको.
माझ्यात ताकद आहे.

राष्ट्रवादीवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, पक्ष उभा करणे, चालवणे याला हिंमत लागते.
आमच्या दहा वर्ष आधी राष्ट्रवादी पक्षाची स्थापन झाली. पण तो पक्ष नव्हता तर जिंकून येणाऱ्या आमदारांची मोळी होती.
महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थाने कुठले पक्ष स्थापन झाले असतील तर तो पहिला जनसंघ, शिवसेना (Shivsena) आणि
त्यानंतर मनसे हे पक्ष आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Inspector Suicide | पुणे सीआयडीमधील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, रेल्वे रुळावर संपवलं जीवन

Pune News | बंगळुरुतील कॅफे बॉम्बस्फोटातील दहशतवादी पुण्यात असल्याचा NIA ला संशय, पथकाकडून तपास सुरु

Khadakwasla Crime | तीन तरुणांवर कोयत्याने हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपींच्या हवेली पोलिसांनी आवळल्या मुसक्या (Video)