‘तो’ म्हणाला पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी ‘भत्‍ता’ देणार नाही ; केवळ ‘डाळ-तांदूळ’ देतो, न्यायाधीशांनी सुनावला ‘हा’ धक्‍कादायक निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब हरियाणा हायकोर्टात पती पत्नीमधील वादाचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या खटल्यात पतीने पत्नीला निर्वाह भत्ता देण्याऐवजी एक नवीनच अट समोर ठेवली आहे. त्यानंतर न्यायाधीशांनी देखील या प्रकरणावर अनोखा निकाल दिल्याने सर्वजण चकित झाले आहेत. या खटल्यात बेरोजगार पतीने आपल्या पत्नीला निर्वाह भत्ता देण्याऐवजी प्रत्येक महिन्याला तांदूळ, डाळ आणि तूप देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर न्यायाधीशांनी देखील त्याला तीन दिवसाच्या आत पत्नीला संपूर्ण राशन देण्याचे आदेश दिल्याने त्यांच्या या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

भिवानी जिल्ह्यातील हे प्रकरण असून, पती आणि पत्नीमधील वादात न्यायाधीशांनी या प्रकरणावर हा अनोखा निर्णय दिला आहे. सत्र न्यायालयाने त्याला पत्नीला महिन्याला विशिष्ट रक्कम देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टात या प्रकरणात पतीने सुनावणीदरम्यान आपण विशिष्ट रक्कम देण्यास समर्थ नसून पत्नीला महिन्याला संपूर्ण राशन भरून देऊ शकतो असे सांगितले. तो सध्या बेरोजगार असून आता तो पत्नीला पैसे देण्यास समर्थ नाही. त्यामुळे आपण पत्नीला महिन्याला २० किलो तांदूळ, ५ किलो साखर, ५ किलो डाळ, १५ किलो कांदे, ५ किलो तूप देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर न्यायाधीशांनी देखील त्याच्या या निर्णयावर सहमती दर्शवत त्याला हे देण्याचे आदेश दिले.

दरम्यान, हायकोर्टाने याला परवानगी देण्याबरोबरच तीन दिवसाच्या आत पूर्ण राशन जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मागील देखील राशन लवकरात लवकर देण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like