‘आशिकी’ फेम राहुल रॉयचा नवा प्रोजेक्ट ! आगामी सिनेमात साकारणार ‘स्ट्रोक पीडित’चा रोल

पोलीसनामा ऑनलाइन – आशिकी (1990 Blockbuster Movie Aashiqui) मधील बॉलिवूड अ‍ॅक्टर राहुल रॉय (Rahul Roy) ब्रेन स्ट्रोकमुळं रुग्णालयात उपचार घेत आहे. राहुल लकवरच एका सिनेमात स्ट्रोक पीडितचा रोल साकारणार आहे. नितीन कुमार गुप्ता या सिनेमाचं डायरेक्शन करणार आहे.

एका मुलाखतीत स्ट्रोक सिनेमाचे डायरेक्टर नितीन कुमार गुप्ता यांनी सांगितलं की, राहुल रॉयला त्याची बहिण घरी घेऊन गेली आहे. काही काळ त्याची स्पीच थेरपी चालेल. याच महिन्यात राहुल रॉयचा सयोनी (Sayonee) सिनेमा रिलीज होईल.

राहुलचा नवीन प्रोजेक्ट

नितीन यांनी सांगितलं की, स्ट्रोक पीडित झाल्यानंतर रिलीज होणारा राहुलचा हा पहिला सिनेमा आहे. यानंतर इतर पोड्युसर्सला राहुल सोबत काम करण्यात संकोच वाटू शकतो. परंतु मी फेब्रुवारीमध्ये त्याच्या सोबत सिनेमात करण्याच्या तयारीत आहे. राहुलचा हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्रीवर आधारीत असेल. आम्ही फिक्शनला सत्यात उतरवून फिल्म प्लॅन करत आहोत.

राहुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आशिकी या सिनेमानंतर त्यानं प्यार का साया, बारिश, जुनून, गजब तमाशा, दिलवाले कभी ना हारे अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. याशिवाय फिर तेरी कहानी याद आई, सपने साजन के, नसीब असेही त्याचे काही सिनेमे सांगता येतील. त्यानं टीव्ही शोज देखील केले आहेत. 2006 साली आलेल्या बिग बॉस च्या पहिल्या सीजनचा तो विनर आहे.