Railway Recruitment 2021 : रेल्वेमध्ये पॅरामेडिकल पदांवर भरती सुरु, 75000 रुपयेपर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन : पश्चिम रेल्वेने सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे . मुंबई सेंट्रलच्या जगजीवन राम वेस्टर्न रेल्वे हॉस्पिटलमध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि पॅरामेडिकल स्टाफच्या पदांवर ही भरती केली जात आहे. इच्छुक उमेदवार आपला अर्ज 06 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी आपला अर्ज दाखल करू शकतात. एकूण 139 रिक्त जागांवर पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. टेलिफोनिक / व्हॉट्सअ‍ॅप मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाईल. कोविड आयसॉलेशन वॉर्डमध्ये फुलटाईम मेडिकल कॉन्ट्रॅक्ट (जीडीएमओ / स्पेशलिस्ट) वर उमेदवारांची भरती होईल.

पदांचा तपशील :
CMP-GDMO – 14 पदे
नर्सिंग अधीक्षक – 59 पदे
रेडियोग्राफर – 02 पोस्ट
रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस तंत्रज्ञ – 01 पोस्ट
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट – 02 पोस्ट.
हॉस्पिटल अटेंडंट – 60 पोस्ट

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 03 एप्रिल 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2021
मुलाखतीची तारीख – 08 एप्रिल 2021

वेगवेगळ्या पदांवर भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता देखील भिन्न आहेत. त्यानुसार वयोमर्यादा देखील निश्चित केली आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत अधिसूचनेत संपूर्ण माहिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 6 एप्रिलपूर्वी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. पोस्टद्वारे पाठविलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कोणत्याही उमेदवाराला वाहतुकीचा भत्ता दिला जाणार नाही. अधिसूचनेत याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे.