Railway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसच्या 3378 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसच्या हजारो पदावर भरतीसाठी Railway Recruitment 2021 अर्ज मागवण्यात आले आहेत. योग्य उमेदवार या 3378 पदांसाठी अर्ज करून भरतीत सहभागी होऊ शकतात. दक्षिण रेल्वेच्या अप्रेंटिसच्या Southern Railway Apprentice या पदांवर ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 30 जून आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

एवढ्या पदांसाठी होईल भरती Railway Recruitment 2021
नोटिफिकेशननुसार रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये Railway Workshop एकुण 3378 पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.
कॅरिज वर्क्स, पेरंबूरमध्ये 936 पदे, गोल्डनरॉक वर्कशॉपमध्ये 756 पदे, सिग्नल अँड टेलीकॉम वर्कशॉप पोदनूरमध्ये 1686 पदे रिकामी आहे, ज्यासाठी ही भरती काढण्यात आली आहे.

महत्वाच्या तारखा
30 जून 2021 पर्यंत अर्ज करता येईल. 30 जून सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत अ‍ॅप्लीकेशन फॉर्मची लिंक अ‍ॅक्टिव्ह राहील.
यापूर्वी जे अर्ज करतील त्यांचे अर्ज सबमिट होतील.
सर्व माहितीसाठी रिक्रूटमेंट सेल Recruitment Cell दक्षिण रेल्वेचे नोटिफिकेशन पाहू शकता.

अखेर ‘त्या’ दोन पोलिस अधिकार्‍यांसह 5 पोलिसांवरील निलंबन मागे; सोमवारी झाली होती ‘सस्पेन्शन’ची कारवाई

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे.
10 वी, 12 वी आणि आयटीआय पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा 15 ते 22 वर्ष आहे. तर काही पदांसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्ष आहे.

अर्ज शुल्क
अप्रेंटिसच्या पदांवर अर्ज करणार्‍या जनरल, ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रूपये आहे. याशिवाय एससी-एसटी, दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.

असे करा अप्लाय
योग्य उमेदवारांनी प्रथम दक्षिण रेल्वेची ऑफिशियल वेबसाइट https://sr.indianrailways.gov.in वर जावे. येथे जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज भरण्यापूर्वी वेबसाइटवर दिलेले नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्या.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Railway Recruitment 2021 southern railway recruitment for 3378 posts of apprentice know last date notification indian railways jobs

हे देखील वाचा

Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय ?