Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाईन : मागच्याच वर्षी पॉर्नोग्राफी (Pornography) या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचे (Raj Kundra) नाव सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाले होते. या प्रकरणानंतर राज कुंद्रा काही काळ सोशल मीडियापासून लांब होता. मात्र आता पुन्हा एकदा राज सोशल मीडियावर सक्रिय झाला असून #AskRaj या सेशन मध्ये राजने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. सोशल मीडियावर झालेल्या एका सेशनमध्ये राज कुंद्राने (Raj Kundra) यांनी त्यांच्यावर केले गेलेल्या सर्व आरोपांची उत्तरं चाहत्यांना दिली होती.

#AskRaj या सेशनमध्ये युजर्सनी राज कुंद्राला पॉर्नोग्राफी केस पासून ते त्याच्या खाजगी आयुष्यापर्यंत अनेक प्रश्न विचारले होते. यावर राज कुंद्राने (Raj Kundra) या सेशनमध्ये सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तर देखील दिली होती.

या सेशनमध्ये एका युजर्सने राज कुंद्राला, “सर तुम्ही अजूनही पॉर्न फिल्म चा व्यवसाय
(Pornography Film Business) करता का”? असा प्रश्न विचारला होता.
अशा पद्धतीचा प्रश्न विचारून या यूजरने राज कुंद्राला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला राज कुंद्राने अतिशय सुंदर असे उत्तर देत लिहिले की, “कधीच असं केलं नाही
आणि कधी असं करणार ही नाही”. राज कुंद्राच्या या उत्तरला युजर्सने भरपूर लाईक्स दिले आहे.
राज कुंद्रावर पॉर्नोग्राफी प्रकरणात चालू असलेल्या केसमध्ये शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) कायमच राजला
खूप साथ दिली होती.

Web Title :- Raj Kundra | raj kundra answer to user who ask him question about porn film business

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ratnagiri ACB Trap | वकीलाकडून 7 हजार रुपये लाच घेताना दुय्यम निबंधक आणि खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra ACP / DySP To DCP/Addl SP | राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना उपायुक्त / अप्पर पोलीस अधीक्षक पदी बढती ! समीर शेख, सागर कवडे, प्रिती टिपरे यांचा समावेश