Raj Thackeray On Ajit Pawar | अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही, राज ठाकरेंनी सांगितला शरद पवारांचा राजकीय इतिहास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray On Ajit Pawar | लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) भाजप महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (शुक्रवार) पुण्यात सभा घेतली. पुण्यातील सारसबाग परिसरात ही सभा झाली. मात्र, पावसाचे सावट असल्यामुळे आजची सभा होईल की नाही, असा संभ्रम होता. परंतु पावसाने दडी मारल्यानंतर नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने राज ठाकरेंची सभा सुरू झाली. यावेळी राज ठाकरेंनी अजित पवारांनी कधीच जातीचे राजकारण केले नाही असे सांगत शरद पवारांना (Sharad Pawar) चिमटे काढले आहेत.(Raj Thackeray On Ajit Pawar)

राज ठाकरे म्हणाले, राज्यामध्ये 1999 पुसून जातीपातीचं विष कालवायला सुरुवात झाली. मात्र, अजित पवार यांनी शरद पवारांसोबत राहून देखील जाती पातीचं राजकारण कधीच केलं नाही. आज काँग्रेसला मतदान करावं, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान कराव, यासाठी फतवे काढले जात आहेत. परंतु आज मी फतवा काढतो की, सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं.

राज ठाकरे पुढे म्हणाले, आज राम मंदिर उभं राहिलं असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे. कारसेवकांनी जे काम केलं त्याचं फळ आज बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये अनेक विकासाची कामं अडली आहेत. मुरलीधर मोहोळ यांना पुणेकरांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

शरद पवारांचा सांगितला इतिहास

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी राजकीय इतिहास सांगत शरद पवारांना लक्ष्य केलं.
विदेशी बाई म्हणून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, असे म्हटले. तर, 2014 व 2019 च्या निवडणुकांवेळीही
काहीतरी विषय होते. मात्र, ही पहिली निवडणूक आहे, ज्याला विषयच नाही. त्यामुळे, भाषणांमध्ये सभांमध्ये शिवराळ भाषा पाहायला मिळत आहे. मी ही सभा का घेत आहे, तर पुणे हे विद्ववानांचं शहर आहे, तरुणाईचं शहर आहे, मोठा संस्कृती वारसांचं हे शहर आहे. जगभरातील अनेक कंपन्यांना या शहराने विद्वान दिले आहेत. त्यामुळे, अशा एका पुणे शहरात, पुन्हा सत्तेत बसणाऱ्या पक्षाची उमेदवारी मुरलीधर मोहोळ यांना मिळाली आहे, म्हणून मी आज पुण्यात सभा घेत आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले.

राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • जेम्स लेन प्रकरण आणले गेले. तुम्हाला जातीमध्ये गुंतवण्यासाठी. त्यामुळे शहरात काय होतेय तुम्हाला कळत नाही.
  • शहराचे काय वाटोळे झाले तरी तुम्ही थंड असता, पण जातीचा विषय निघाला की पेटून उठता.
  • नियोजन शून्य रचनेमुळे शहर बर्बाद होत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून शहर वाचवत नसतील.
  • नोकऱ्या आणि शिक्षणाची राजधानी आहे पुणे तरी तरुण शिक्षणासाठी बाहेर का जात आहेत असा प्रश्न निर्माण होतो .
  • आपल्या इथल्या वातावरणामुळे तरुण देशाच्या बाहेर जात आहेत
  • आमदार खासदार यांची जबाबदारी आहे की वातावरण चांगलं करणे .
  • मुंबई शहर बरबाद व्हायला काळ गेला
  • पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही, शहराच नियोजन नाही
  • पुणे महानगरपालिका शहराची लोकसंख्या ७० लाख आणि वाहन ७२ लाख कुठून रस्ता मिळणार पुणेकरांना

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | आढळराव पाटलांनी लांडेवाडीतली वनखात्याची 25 एकर जमीन लाटली; चाकणच्या सभेत डॉ. कोल्हेंनी केला पुराव्यासह गौप्यस्फोट