Raj Thackeray On FSI In Pune | पुणे शहरात एफएसआयचा सुळसुळाट झालाय पण रस्ते कुठे आहेत? (Video)

वास्तुविशारदांना असलेली सौंदर्यदृष्टी उपयोगात आणून काम करण्याची गरज – राज ठाकरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray On FSI In Pune | पुणे शहरात एफएसआयचा सुळसुळाट झाला आहे. टोलेजंग इमारती उभा राहात आहेत. लोकसंख्येनुसार पुण्यात १५ टक्के रस्ते असायला हवेत हा आकडा आज ७-८% इतकाच आहे. एके दिवशी पुणेकर घरातून निघेल आणि तिथेच अडकून बसेल. वास्तुविशारदांना असलेली सौंदर्यदृष्टी उपयोगात आणून शहरीकारणाशी संबंधित काम करण्याची आज गरज आहे, असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले. (Raj Thackeray On FSI In Pune)

इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस, पुणे सेंटरच्या वतीने जागतिक शिक्षक दिन आणि जागतिक वास्तुविशारद दिनाचे औचित्य साधत सातारा रस्ता, बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते ५० वर्षांपेक्षा जास्त काळ आर्किटेक्चर क्षेत्रात कार्यरत असणार्‍या विकास भंडारी, विश्वास कुलकर्णी आणि शोभा भोपटकर या वास्तुविशारदांचा आयआयए एस. के. बेलवलकर अवार्ड फॉर एक्सलन्स इन प्रोफेशन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अवचट, सहसचिव संदीप बावडेकर, इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या पुणे सेंटरचे अध्यक्ष विकास अचलकर, उपाध्यक्ष सीतेश अग्रवाल आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यानंतर निवेदक, लेखक दीपक करंजीकर, विकास अचलकर आणि सीतेश अग्रवाल यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. (Raj Thackeray On FSI In Pune)

राज ठाकरे म्हणाले, या आधी स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट हे महापालिका देत असे आज या गोष्टी मी उपलब्ध करून देतोय असे बिल्डर्स सांगतायेत. याचा अर्थ महानगरपालिका ही केवळ परवानगीपुरती राहिली आहे का? आपण करत असलेल्या गोष्टी कोणासाठी करतो त्याबद्दल आपल्याला आस्था असायला हवी. ती आस्था मला आहे, त्यामुळे भविष्यात कधीही वास्तुविशारदांनी त्यांच्या संकल्पना घेऊन मला भेटावे मी जे करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न करेल, असेही ठाकरे म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले की, सौंदर्यदृष्टी ही सत्तेत असायला हवी. शहरीकरण, शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी काय व्हायला हवे, त्यासाठी कशा पद्धतीच्या कामाची गरज आहे, ते कोणाला सांगायला हवे हेच आज कळत नाही. त्यामुळे सत्तेत असलेल्या राजाला सौंदर्यदृष्टी असेल तर आपोआप ती कार्यपद्धतीमध्ये झिरपत जाते. आपल्याकडे शहर नियोजनाच्या आराखड्यापेक्षा शहराचे विकास आराखडे महत्त्वाचे मानले जातात. वास्तुविशारदांपेक्षा शहर अभियंत्याला जास्त महत्त्व दिले जाते ही सद्यपरिस्थिती आहे. केवळ रस्ते बांधून चालणार नाही तर त्यावरून जाताना कोणत्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, हेही कृतीत उतरायला हवे.

मध्यमवर्गीय नागरिकांनी राजकारणाकडे लक्ष द्यायला हवे

मध्यमवर्ग हा गरीब आणि श्रीमंत यांमधील दुवा होता. १९९५ नंतर देशाच्या आर्थिक धोरणांत जे काही बदल झाले त्यामुळे काय होऊ शकेल याचा अंदाज मध्यम वर्गीयांना आला.
इंटरनेट सुविधा आणि इतर बाबी यांमुळे सर्वांच्याच आयुष्याला वेग आला आणि मध्यमवर्गाची पकड ढीली झाली.
मात्र आता मध्यमवर्गीयांनी राजकारणात लक्ष द्यायला हवयं.
बदल घडवायचा असेल तर मध्यमवर्गीय नागरिकांनी अगदी निवडणूक लढवण्याची गरज नसली
तरी त्यांनी राजकारणाकडे लक्ष द्यायला हवयं, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.
https://www.instagram.com/reel/CyqM-EfJk8G/

पुणे शहर मुंबई सारखे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही

मुंबई बरबाद व्हायला काळ जावा लागला मात्र पुण्याची ती अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.
आज या शहरात पाच पाच पुणे आहेत. हिंजवडीचे पुणे वेगळे, खराडीचे,
नदीकाठचे पुणे वेगळे अशी परिस्थिती आहे. पुण्याकडे कोणत्याही राजकारण्याचे लक्ष नाही.
दळणवळणाची साधने आल्यानंतर शहर नियोजन बदलावे लागते हा विचारही होत नाहीये.
माझ्या हातात जर राज्याची सत्ता आली तर मी सर्व वास्तुविशारदांकडून शहरांचे नियोजन करून घेईल.
शहरांची आखणी योग्य पद्धतीने झाली तरच, सुंदर शहरे वसणार आहेत.
शहर नियोजन हे काही रॉकेट सायन्स नाही अशी कोपरखळीही ठाकरे यांनी मारली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

EVM मध्ये गोंधळ करता येऊ शकतो; आयटीतज्ज्ञ माधव देशपांडे यांनी प्रात्यक्षिकासह दाखवले

Ajit Pawar | भल्या पहाटे पाहणी दौरा का करता? पत्रकारांच्या प्रश्नाला अजित पवारांचे खास शैलीत उत्तर