Raj Thackeray Sabha In Pune | पुण्यात धडाडणार ठाकरी तोफ! भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची 10 तारखेला प्रचारसभा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Raj Thackeray Sabha In Pune | पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha) महायुतीचे भाजपाचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. राज ठाकरे सध्या महायुतीच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत असून त्यांनी भाजपाचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीत सभा घेतली होती. ही सभा चांगलीच चर्चेत आहे. आता राज ठाकरेंची तोफ मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात धडाडणार आहे.(Raj Thackeray Sabha In Pune)

पुणे लोकसभेच्या रिंगणात महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांच्यासह मनसेची साथ सोडून वंचितकडून उभे असलेले वसंत मोरे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर सुद्धा रिंगणात आहेत.

पुण्यात राज ठाकरेंची सभा १० तारखेला होईल. पुण्यातील नदी पात्रात ही सभा होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप सभास्थळाची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

राज ठाकरे यांनी कणकवलीत नारायण राणे यांच्यासाठी घेतलेली सभा चांगलीच गाजली होती.
त्यानंतर ते पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी येत आहेत.
कणकवलीच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
कोकणातील धंदे गुजरातला पळवले जात आहेत, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते.

यावर राज ठाकरे यांनी कणकवलीत म्हटले की, कोकणातले धंदे गुजरातला जात आहेत म्हणता.
वा रे वा २०१४ ते २०१९ या काळात तुम्ही त्यांच्या सोबत होतात. तेव्हा त्यांना विरोध का केला नाही? असा सवाल राज ठाकरे
यांनी केला. आता पुण्यातील सभेत राज ठाकरे यांची तोफ कुणाकुणावर धडाडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cheating Fraud Case Pimpri | पिंपरी : शेअर्स मार्केटच्या नावाखाली 38 जणांची एक कोटी 12 लाखांची फसवणूक

Baramati Lok Sabha Election 2024 | पुण्यासह 157 मतदान केंद्र संवेदनशील, बारमतीत अनुचित प्रकार घडला तर…; सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र

Ravindra Dhangekar | पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी, इंडीया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन ! नव्या भारतात लोकशाही धोक्यात – डॉ. शशी थरूर