CM गेहलोत म्हणाले – ‘पुन्हा सुरू होणार आहे सरकार पाडण्याचा खेळ’, BJP सह पायलट यांच्यावर निशाणा

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   राजस्थानात मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पुन्हा राजकीय खळबळ माजली आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप केला आहे की, पुन्हा एकदा सरकार पाडण्याचा खेळ सुरू होणार आहे. अशोक गेहलोत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, राजस्थानचे सरकार पाडण्याचा खेळ सुरू होणार आहे. महाराष्ट्रातसुद्धा सरकार पाडण्याची चर्चा आहे.

गेहलोत यांनी म्हटले की, भाजपकडून यापूर्वी सरकार पाडण्याच्या प्रयत्नाचे साक्षीदार अजय माकन होते. राजस्थानमध्ये काँग्रेसचे प्रभारी अजय माकनसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होते. या घटनेच्या दरम्यान माकन 34 दिवस हॉटेलमध्ये आमच्या आमदारांसोबत राहिले होते.

अशोक गेहलोत यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केला की, आमच्या आमदारांना बसवून खाऊ घालत होते आणि सांगत होते की, पाच सरकारे पाडली आहेत, सहावेसुद्धा पाडणार आहे. धर्मेंद्र प्रधान त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी जजेसशी चर्चा करण्याबाबत बोलत होते. गेहलोत म्हणाले, अमित शाह यांनी आमच्या आमदारांशी एक तासाची भेट घेतली होती आणि पाच सरकार पाडल्यानंतर सहावेसुद्धा पाडणार असल्याचे ते म्हणाले होते.

गेहलोत म्हणाले, या घटनाक्रमावेळी काँग्रेस नेते अजय माकन, रणदीप सुरजेवाला, अविनाश पांडे येथे येऊन बसले. त्यांनी नेत्यांना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सरकार वाचले. त्यांनी म्हटले की, संपूर्ण राजस्थानच्या जनतेला वाटत होते की, सरकार पडू नये. राज्यातील लोक काँग्रेस आमदारांना फोन करत होते की, सरकार पडू नये. लोक म्हणत होते की, दोन महिने लागले तरी चालतील पण सरकार पडू नये.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपच्या बहाण्याने माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधला आहे, असे म्हटले जात आहे. राजस्थानमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशावेळी नाव न घेता सचिन पायलट यांच्यावर राजकीय हल्ला करण्यासाठी निमित्त शोधले जात आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या या आरोपावर भाजपचे राज्य अध्यक्ष सतीश पुनिया यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले की, अशोक गेहलोत हे सरकार चालवण्यास सक्षम नाहीत, यासाठी खोटे आणि निराधार आरोप करत आहेत. काँग्रेस अंतर्गत भानगडी आहेत, ज्यामुळे ते त्रस्त आहेत. यासाठी भाजपवर कोणताही पुरावा नसताना आरोप करत आहेत.

राज्य अध्यक्ष पुनिया यांनी म्हटले की, अशोक गेहलोत सरकार पाडण्याबाबत रोज लांडगा आला रे आला, यांसारख्या नवीन गोष्टी घेऊन येतात. यांच्या सरकारमध्ये इतकी भांडणं आहे की, हे भाजपच्या नेत्यांना दोष देऊन आपल्या भानगडी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुनिया म्हणाले, अशोक गेहलोत यांनी आरोप केला की, भाजप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून कार्यालय बनवत आहे आणि आम्ही तर म्हणत आहोत की, इतक्या वर्षांपासून सत्तेत राहिलेल्यांनी कार्यालय बनवण्याऐवजी आपली घरे बनवली.