GST चोरीत 5 जणांना अटक, 1004 कोटींचे बनावट बिल फाडले, 146 कोटीचा रिफंड घेतला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानमध्ये जीएसटी (GST) चोरीच्या मोठ्या घटनेचा भडका उडाला आहे. येथे जयपूरच्या वैशाली नगर येथे राहणारा एक व्यावसायिक विष्णू गर्ग अनेक कंपन्या तयार करून बनावट बिलांद्वारे जीएसटी (GST)  चोरी करत होता. जयपूर स्थित डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेंसने विष्णू गर्गच्या सीएसहित पाच जणांना अटक केली आहे.

या लोकांनी 25 कंपन्या तयार करून मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली आणि मुंबईसह अनेक राज्यांत आपल्या वस्तूंची हालचाल दर्शवून 1004 कोटी रुपयांची बनावट बिले बनवण्यात आली होती. या लोकांनी 146 कोटींचा चुकीच्या पद्धतीने परतावा देखील घेतला होता.

मास्टर माइंड विष्णू गर्ग जवळून जप्त केलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की त्याने आतापर्यंत 200 कंपन्यांचे चालान सादर केले आहेत. त्यांच्याकडून इमारती लाकूड, भंगार, प्लायवुड आणि सोने इत्यादींची खरेदी-विक्री संबंधित बिले जप्त करण्यात आली आहेत. सर्वात जास्त व्यवहार पाच कंपन्यांमार्फत झाले आहेत.

मेसर्स विकास ट्रेडिंग कंपनी, मेसर्स श्याम ट्रेडर्स, मेसर्स विनायक असोसिएट्स, मेसर्स एपी एंटरप्राईजेस, मेसर्स बीके इंडस्ट्रीज अँड कॉर्पोरेशन नावाच्या या कंपन्या वास्तविक पुरवठा न करता बनावट बिले तयार करून इनपुट क्रेडिट मिळविण्याचा खेळ खेळत होती.