Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची माहिती, म्हणाले – ‘राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला, लसींचा साठा शून्यावर’

ADV

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्यातील कोरोना लसीकरणाबाबत (Covid vaccination) आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लसीच्या डोसचा तुटवडा असल्याने (short supply of doses) कोरोना लसीकरणाचे (vaccination) प्रमाण कमी झाले आहे. दररोज 10 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करणे हे सरकारची योजना आहे. मात्र केवळ अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे टोपे म्हणाले. एवढंच काय तर राज्यातील लसीचा साठा शून्यावर आल्याचेही टोपे यांनी सांगितले आहे. Rajesh Tope | covid 19 vaccination rate dropped short supply doses rajesh tope said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ADV

लोकसंख्येपैकी 70 टक्के नागरिकाचे लवकर लसीकरण व्हावं अशी सरकारची योजना आहे.
असे झाल्यास राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल. मंगळवारी (दि.29) लसीकरणाचा वेग मंदावला होता. काल केवळ 3 लाख 80 हजार लोकांचे लसीकरण झाले.
गेल्या काही दिवसात हा आकडा सरासरी 7 लाखांच्या आसपास होता,अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडेवारी

राज्यात मंगळवारी (दि. 29) 8 हजार 085 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
8 हजार 623 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 9 हजार 548 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे.
सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 098 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात काल 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात सध्या राज्यात 6 लाख 21 हजार 836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर 3 हजार 584 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title : Rajesh Tope | covid 19 vaccination rate dropped short supply doses rajesh tope said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission latest news | सप्टेंबरपासून केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होणार घसघशीत वाढ, जाणून घ्या किती वाढणार तुमचा पगार