रजनीकांतच्या ‘काला’ने प्रदर्शनापूर्वीच २३० कोटींचा जमवला गल्ला

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

रजनीकांत अभिनित ‘काला’ चित्रपटाची चालीचं चर्चा आहे. हा बहुप्रतीक्षित ‘काला’ चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. रजनीकांतचा चित्रपट म्हणजे बॉक्स ऑफिस वरील त्याची उच्च कमाई अशी देखील चर्चा असते. आता ‘काला’ प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याने २३० कोटींची कमाई केल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नाना पाटेकर आणि हुमा कुरेशी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चित्रपट प्रक्षेपणाचे आणि गाण्याचे हक्क विकून ‘काला’ने सुमारे २०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. तामिळनाडूमध्ये ७० कोटी रुपये, आंध्रप्रदेश आणि निजाममध्ये ३३ कोटी रुपये, केरळात १० तर उर्वरीत देशात ७ कोटी रुपयांत हे हक्क विकले गेले आहेत. तर देशाबाहेर ४५ कोटी रुपयांना प्रक्षेपणाचे हक्क विकण्यात आले असून एकूण १५५ कोटी रुपयांची कमाई झाली. याशिवाय गाण्याचे हक्क ७५ कोटींना विकून एकूण कमाई सुमारे २३० कोटी रुपये इतकी झाली आहे. यावरून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किती कमाई करतो याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात धारावीच्या झोपडपट्टीतील तामिळ लोकांचा नायक म्हणजे रजनीकांत ‘काला’ आहे, तर नाना पाटेकर या चित्रपटात एक राजकारणी असून तो खलनायकाची भूमिकेत आहे. . धारावीतील गँगस्टर काला(रजनीकांत) आणि राजकारणी हरी दादा( नाना पाटेकर) या दोघांच्या संघर्षातून हा चित्रपट उलगडत जातो. पहिल्यांदाच हुमा कुरेशी आणि रजनीकांत यांच्यातील केमिस्ट्री चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाला संतोष नारायणननी संगीत दिले आहे .