आतापर्यंत २०२१ मध्ये या कंपन्यांनी ‘या’ गुंतवणूकदारांना केले श्रीमंत; राकेश झुनझुनवाला यांनी आपला हिस्सा का कमी केला? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेअर बाजाराचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला कोणाला माहीत नाही…..त्यात गुंतवणूक केल्याने बाजाराला दिशा मिळते. स्टोक एक्सेंजरवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, राजेश झुनझुनवाला यांची ३९ हून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. त्यामध्ये डिसेंबर तिमाहीत त्यांची ९ कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. ज्यामध्ये डिसेंबर तिमाहीत त्यांनी ९ कंपन्यांमधील हिस्सा कमी केला. भागभांडवल कमी केल्यानंतर ९ पैकी ५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी दिसून आली. सन २०२१ मध्ये आतापर्यंत या कंपन्यांनी ४० टक्के परतावा दिला आहे.

कोणत्या कंपन्यांनी भागभांडवल विकले आहे?

मनी कंट्रोलच्या बातमीनुसार डिसेंबरच्या तिमाहीमध्ये, राकेश झुनझुनवाला यांनी ९ कंपन्यांचे स्टोक विकले आहेत. क्रिसिल, एप्टेक, फेडरल बँक, रॅलीस इंडिया, फोट्रिस हेल्थकेअर, ऑटोलीन इंडस्ट्रीज, इस्कोटर्स आणि फोट्रिस फेल्थकेअर यासोबत त्यांची आवडती कंपनी टायटन यांचा समावेश आहे.

या कंपन्यांनी नकारात्मक परतावा दिला
सन २०२१ मध्ये ८ पैकी ५ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्याचबरोबर क्रिसिल, टायटन, ऑटोलीन इंडस्ट्री आणि रॅलीस इंडियाने नकारात्मक परतावा दिला आहे.

राकेश झुनझुनवाला यांचा हिस्सा कमी झाल्यानंतर आपटेक यांनी गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा दिला आहे. आप्टेकने आतापर्यंत ३९ टक्के गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत १५७ रुपये होती, जी आजच्या बाजारात २१८ रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत आहे.

कोणत्या कंपन्यांचा किती हिस्सा आहे?
बिग बुल यांनी डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या शेअर्सपैकी ०.७१ टक्के शेअर्सची विक्री केली होती आणि त्यांच्या कंपनीमधील भागभांडवल २३.८४ टक्केवर आली आहे. याव्यतिरिक्त बिग बुलने क्यू फेडरलमधील फेडरल बँकेचे ०.११ टक्के भागभांडवल विकले आणि त्यांची कंपनीमधील भागभांडवल आता २.४ टक्केवर आली आहे. त्यानंतर नव्या वर्षात कंपनीच्या समभागात २९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत त्यांची शेअर किंमत फक्त ६६.७० रुपये होती, जी आज वाढून ८७.६५ रुपये झाली आहे.

फोट्रिस फेल्थकेअरच्या शेअर्समध्ये १५ टक्केनी वाढ झाली आहे. या कंपनीत झुनझुनवाला यांचा वाटा २.८ टक्के आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी त्यांची शेअर किंमत फक्त १५५ रुपये होती. ती आज वाढून १७७ रुपये झाली आहे.