Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनच्या दिवशी 474 वर्षानंतर अद्भूत योग, गज केसरी योगमध्ये बांधली जाणार राखी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनचा सण (Raksha Bandhan festival 2021) यावर्षी रविवारी 22 ऑगस्टला साजरा केला जाईल. यावर्षी हा सण श्रावण पौर्णिमेच्या धनिष्ठा नक्षत्रा (Dhanishtha Nakshatra) सह साजरा केला जाईल. शोभन योग (Shobhan Yog) सुद्धा हा सण खास बनवत आहे. ज्योतिषतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यावेळी रक्षाबंधनला एक महायोग सुद्धा होत आहे.

ज्योतिषतज्ज्ञांनुसार, रक्षाबंधनचा सण राजयोगात (Raj Yog) येईल.
यावेळी भद्राचे सावट सुद्धा नसेल ज्यामुळे भगिनी संपूर्ण दिवस भावाला राखी बांधू शकतात.
या दरम्यान कुंभ राशीत गुरुची चाल वक्री राहिल आणि त्याच्यासोबत चंद्रही असेल.

गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे रक्षाबंधनला गजकेसरी योग होत आहे.
गजकेसरी योगमुळे मनुष्याच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतात. धनसंपत्ती, घर, वाहनसारखी सुख प्राप्त होतात.
गज केसरी योगाने राजेशाही सुख आणि समाजात मान-सन्मानाची सुद्धा प्राप्ती होते.

गजकेसरी (Gajakesari Yog) योगमुळे कुणाला होणार नाही लाभ –

कुंडलीत जेव्हा चंद्र आणि गुरु केंद्रात एकमेकांकडे दृष्टी करून बसले असतील तेव्हा गजकेसरी योग (Gajakesari Yog) होतो.
हा लोकांना भाग्यशाली बनवतो, परंतु जर कुंडलीत गुरू किंवा चंद्र कमजोर असेल तर या योगचा लाभ मिळत नाही.

यासोबतच, रक्षाबंधनला सिंह राशीत सूर्य, मंगळ आणि बुध ग्रह एकाचवेळी विराजमान होतील.
सिंह राशिचा स्वामी सूर्य आहे. या राशीत मित्र मंगळ सुद्धा त्यांच्यासोबत राहिल.
तर शुक्र कन्या राशीत असेल. ग्रहांचा असा योग अतिशय शुभ आणि फलदायी राहणार आहे.

ज्योतिषतज्ज्ञांचे म्हणणे आहे की रक्षाबंधनला असा दुर्मिळ योग 474 वर्षानंतर होत आहे.
यापूर्वी 11 ऑगस्ट 1547 ला ग्रहांची अशी स्थिती तयार झाली होती.

 

राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त (Auspicious time) –

रक्षाबंधनला यावेळी राखी बांधण्यासाठी 12 तास 13 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल.
सकाळी 5.50 पासून सायंकाळी 6.03 पर्यंत कधीही राखी बांधू शकता.
तर भद्राकाळ 23 ऑगस्टला सकाळी 5 वाजून 34 मिनिटांपासून 6 वाजून 12 मिनिटांपर्यंत राहिल.

या दिवशी शोभन योग सकाळी 10 वाजून 34 मिनिटापर्यंत राहिल आणि धनिष्ठा नक्षत्र सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटापर्यंत राहिल.
असे म्हणतात की, धनिष्ठा नक्षत्रात जन्माला येणार्‍या लोकांचे भाऊ-बहिणीशी नाते खुप विशेष असते आणि यासाठी रक्षाबंधनला धनिष्ठा नक्षत्राला विशेष मानले जात आहे.

 

Web Title : raksha bandhan 2021 auspicious yog on rakhi after 474 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | ‘दारू दुकानात मंदिरापेक्षा जास्त गर्दी, मग मंदिरे बंद का? (व्हिडीओ)

Bharti University Recruitment | भारती विद्यापीठ पुणे येथे विविध पदांसाठी लवकरच भरती

Kirit Somaiya | दापोलीतील मुरूडच्या समुद्रकिनारी अनधिकृत बंगले? शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर अन् अनिल परब अडचणीत