‘उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार’ ! कंगनाच्या वक्तव्यावर वर्षभरानंतर बोलते झाले राम गोपाल वर्मा; म्हणाले – ‘कुणाच्या भावना दुखावू नये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या वक्तव्यामुळे तिला अनेकवेळा ट्रोल करण्यात आले. मागिल वर्षी कंगना आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात वाद झाला होता. यानंतर त्यांच्यातील वाद जास्त पेटला तेव्हा एका मुलाखतीत कंगनाने उर्मिला मातोंडकरला ‘उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार’ असे म्हटले होते. सोशल मिडियावर या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. काही जणांनी कंगनाच्या या विधानावरुन सन्मानाने बोलायला हवं, असा सल्ला दिला. आता कंगनाच्या या वक्तव्यावर वर्षभरानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपले मौन सोडले आहे.

राम गोपाल वर्मा एका मुलाखतीत म्हणाले की, बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असलं तरी त्यामुळे आपण कुणाच्या भावना दुखावू नयेत, असं राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुलाखतीत ते म्हणाले, कंगना रणौतच्या या प्रकाराच्या वक्तव्याने मला खूप त्रास झाला. बोलण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला पाहिजे. मात्र ते आक्रमक नसावे. कंगना उर्मिलाबद्दल काय विचार करते हे तिचं मत आहे. यावर मी काहीही बोलणार नाही. परंतु एक दिग्दर्शक म्हणून मी उर्मिलाचं काम पाहिलं आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आणि कलाकार आहे, असे राम गोपाल वर्मा यांनी सांगितले.

Advt.

काय म्हणाली होती कंगना रणौत ?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणानंतर कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली. कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सडकून टीका केली. तिच्या वक्तव्यावर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर एका मुलाखतीत उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचा खरपूस समाचार घेतला. त्याला उत्तर देताना कंगनाने ‘उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार’ आहे असे म्हटले. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग ? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना ? जर त्यांना तिकीट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार ? कोणालाही तिकीट मिळू शकते. अशा शब्दात कंगनाने उर्मिलावर टीका केली होती.