Rama Mahto | सापाने दंश केल्याने संतापलेल्या जेष्ठाने सापाला चावा घेऊन केले ठार, म्हणाला – तुझी हिंमत कशी झाली…

पाटणा : वृत्तसंस्था –   बिहारच्या (Bihar) नालंदामध्ये एका 65 वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीला साप चावला असता त्याने रागाच्या भरात सापाला (snake) चावा घेतला आणि ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, सापाने दंश केल्यानंतर काही वेळानंतर या ज्येष्ठाचा मृत्यू झाला. rama mahto killed snake after sake bite of old man in nalanda bihar

पोलिसांनी सांगितले की, रामा महतो (Rama Mahto) यांना सापाच्या पिलाने शनिवारी रात्री दंश केला.
या दरम्यान नशेत असलेल्या रामा महतो यांनी सापाला पकडले आणि बोलू लागले की तुझी हिंमत कशी झाली, तु मला चावतोस. मी तुला चावणार.
यानंतर महातो यांनी यांनी सापाला चावून-चावून ठार मारले.

जेव्हा रामा महतो सापाला चावत होते तेव्हा या सापाने अनेक वेळा त्यांच्या तोंडाला दंश केला.
यामुळे रामा महतो यांनी मेलेल्या सापाला झाडाच्या फांदीवर अडकवले आणि झोपायला गेले.
यावेळी उपचारासाठी लोकांनी सांगितले असता त्यांनी नकार दिला.
दुसर्‍या दिवशी जेव्हा ते बेशुद्धावस्थेत सापडले तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

Web Title : rama mahto killed snake after sake bite of old man in nalanda bihar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM-Kisan | मोठी खुशखबर ! 9.5 शेतकर्‍यांच्या खात्यात आला 9वा हप्ता, चेक करा तुमच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसा?

Rupee Bank | रुपी बँकेच्या ठेवीदारांना मुदत ठेवीचे पैसे 90 दिवसात मिळतील, केंद्रीय अर्थमंत्र्यांची ग्वाही

Pune Crime | माजी उपसरपंचासह एकाला पिस्टल बाळगल्या प्रकरणी अटक