Ramesh Chennithal On Ashok Chavan | अशोक चव्हाणांवर काँग्रेसचा हल्लाबोल ! दोनवेळा मुख्यमंत्री बनवले, मैदान सोडून पळाले, डरपोक लोक…

मुंबई : Ramesh Chennithal On Ashok Chavan | अशोक चव्हाण वगळता कोणीही काँग्रेस सोडणार नाही. सर्व एकजूट आहेत, अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने सर्व दिले. त्यांना दोनदा मुख्यमंत्री केले, ते सीडब्ल्यूसीचे सदस्य होते तरीही ते मैदान सोडून पळाले, असा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केला. (Ashok Chavan Join BJP)

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस अलर्ट झाली आहे. रमेश चेन्निथला यांनी तातडीने राज्यातील दिग्गज नेत्यांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. (Ramesh Chennithal On Ashok Chavan)

यावेळी रमेश चेन्निथला म्हणाले, डरपोक लोक पक्ष सोडत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होणार नाही. काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराने असे केल्यास त्याला ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाईल. केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला, मात्र त्यांच्या जाण्याने पक्ष अजिबात कमकुवत होणार नाही, कार्यकर्ते काँग्रेससोबत आहेत.

चेन्निथला म्हणाले, काँग्रेस पूर्णपणे एकसंध आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत इतर कोणतेही नेते पक्ष सोडणार नाहीत.
भाजपाने ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले त्यांना दरवाजे खुले केलेत.
अजित पवारांचा ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा, आता भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये ते क्लिन होतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

API And Two Lady Cops Suspended In Pune | पुणे: सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (API) दामिनी पथकातील 2 महिला पोलिस तडकाफडकी निलंबीत

Shiv Sena MP Sanjay Raut | अशा पद्धतीने ते २०० पार सुद्धा जाणार नाहीत, संजय राऊत यांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

Ashok Chavan | भाजपा प्रवेशानंतर आदर्श घोटाळ्याबाबत अशोक चव्हाण म्हणाले, ”हा चिंतेचा विषय…”

Pune Datta Nagar Crime | ‘तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो’ ! पितापुत्राच्या पोटात चाकूने सपासप वार करुन जीव ठार मारण्याचा प्रयत्न

Fire At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवरील डब्याला मध्यरात्री आग; यार्डातील डबा जळून खाक, जीवित हानी नाही (Video)

TET Exam Scam | टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने न्यायालयाने केले परत