बाहुबली मधील भल्लालदेव आंध्राचा मुख्यमंत्री होणार 

हैद्राबादः वृत्तसंस्ठा
बाहुबली या बहुचर्चीत  चित्रपटामध्ये भल्लालदेवाची भूमिका समर्थपने साकारलेला अभिनेता राणा डग्गुबती लवकरच चाहत्यांसाठी एक अनोखी भेट देणार आहे. राणा डग्गुबती हा महान अभिनेते एनटीआर (नंदमुरी तारका रामाराव) यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटात दिसणार आहे. यामध्ये राणा आंध्र प्रदेशचे मुख्यंमंत्री चंद्रबाबू नायडू यांची भूमिका साकारणार आहे.
स्वतःच राणा डग्गुबती यानं ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. चरित्रपटाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच राणा डग्गुबती याने चंद्राबाबू नायडूंची भेट घेतली होती. तुम्हाला लवकरच एनटीआर यांचं आयुष्य उलगडणारी कथा सांगणार आहे. असे राणानं ट्विटच्या माध्यामातून म्हटलं आहे. या चित्रपटात एनटीआर यांच्या पत्नीची भूमिका बाॅलिवूड अभिनेत्री विद्या बालन साकारणार आहे.
[amazon_link asins=’B078TFFR34′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8e5cd4b5-9ece-11e8-adaf-c5431b1c0814′]