एक चूक महागात पडली राणी मुखर्जीला नाहीतर आज झाली असती बच्चन कुटुंबाची सून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी हे अनेक चित्रपटात एकत्र दिसले आहे. तद्वतच कलाकारांच्यात शुटिंगवेळी बऱ्याचदा जवळीकता वाढते. यांच्यात सुद्धा असेच काहीसे झाले होते. व जया बच्चन यांनी त्यांच्या नात्यास होकार सुद्धा दिला होता. मात्र, नंतर त्यांच्या आणि राणीच्या नात्यात कटुता निर्माण झाली आणि त्याचा परिणाम अभिषेकच्या रिलेशन शिपवर झाला.

अभिषेक आणि राणी ‘लागा चुनरी में दाग’ या चित्रपटात काम करत होते. सुरुवातीस त्यांच्यात सर्व काही ठीक होते. परंतु, नंतर त्या दोघांच्यात सतत वाद उद्भवू लागले. ते इतके वाढले की त्या दोघांनी एकमेकांसोबत बोलणे बंद केले. मिळालेल्या माहितीनुसार, राणी बंगाली असल्याने जया बच्चन यांनी तिला सून बनवण्यासाठी नकार दिला. पण चित्रपट रिलीज झाल्यावर राणी मुखर्जीचे कुटूंब बच्चन हाऊसमध्ये गेले होते. तेथे जया बच्चन यांनी राणीबाबत असे काही म्हटले की मुखर्जी कुटूंबास ते अजिबात आवडले नाही, शेवटी अभिषेकने राणीसोबत ब्रेकअप केले.

दरम्यान, असे सुद्धा सांगितले जाते की ऐश्वर्या राय साठी जया बच्चन या खूप स्ट्रिक्ट वागतात. म्हणून त्यांच्यात बऱ्याचदा जमत नसल्याचे सुद्धा बोलले जाते. ऐश्वर्या सोबत लग्न करण्याआधी अभिषेकाचा करिश्मा कपूरसोबत साखरपुडा झाला होता. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकासुद्धा छापण्यात आल्या होत्या. पण परत दोन्ही कुटूंबीयांकडून लग्न मोडल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याबाबतचे कारण उघडकीस आले नाही.

त्याच्यानंतर अभिषेक आणि राणी मुखर्जी प्रेमात पडले होते. राणी सोबत नात्यात दुरावा आल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात ऐश्वर्या राय आली आणि दोघे लग्नबेडीत अडकले. आता त्यांना एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे. दोघे संसारात सुखी आहेत.

You might also like