Ranveer Singh | रणवीर सिंग झाला होता नापास; ‘या’ विषयात मिळाले होते शून्य मार्क

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणवीर व आलिया यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटातील गाणी हिट झाली असून प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणवीर व आलिया (Ranveer And Alia) देखील चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. दरम्यान एका मुलाखतीमध्ये तो शाळेमध्ये असताना एका विषयामध्ये त्याला 0 गुण मिळाले होते हे अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) कबुल केले आहे.

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यादरम्यान त्यांनी 100 शहरांमधील 50 हजार मुलांशी संवाद साधला. यावेळी रणवीर सिंग, आलिया भट्ट व चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर (Director Karan Johar) उपस्थित होते. यावेळी त्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला व शालेय जीवनातील अनेक किस्से शेअर केले. रणवीरने उपस्थित मुलांना मजेशीर प्रश्न विचारला. त्याने विचारले की, त्यांना 100 पैकी शून्य आणि उणे (मायनस) 100 गुण मिळाले आहेत का ? रणवीरच्या या प्रश्नावर सर्वत्र हशा पिकला.

https://www.instagram.com/p/Cu_Pxz3LeM3/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/Cu1c-8CLAiG/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CspxvSZoZua/?igshid=MzRlODBiNWFlZA==

पुढे त्याने सांगितले की, “मी असे नंबर आणले आहेत. मला एकदा गणिताच्या पेपरमध्ये शंभरपैकी शून्य मार्क्स मिळाले होते, त्यामुळे मॅडमने माझे मायनस 10 नंबर कापले होते.” रणबीरचा शाळेतील हा गमतीशीर किस्सा सांगितलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर रणवीरच्या चाहत्यांनी त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

https://www.instagram.com/p/Csp1MbQLm0V/?igshid=MzRlODBiNWFlZA==
[https://www.instagram.com/p/CrkhNQWOd9s/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/Cmeb61BoMC1/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/CmMEmcXoway/?igshid=MzRlODBiNWFlZA==

या इव्हेंटमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये आलिया भट्टचा तिच्या मुलीने कोणते करिअर निवडावे याबद्दलचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर गाजत आहे. रणवीर (Ranveer Singh) व आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट येत्या 28 जुलैला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित (Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date) होणार आहे. यामध्ये जया बच्चन (Jaya Bachchan), धर्मेद्र (Dharmendra), शबाना आज़मी (Shabana Azmi) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/CmJfulXqQAD/?igshid=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/Cj4Od7iBr__/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lust Stories 2 | लस्ट स्टोरीज् 2 मधील अंगद बेदीच्या बोल्ड सीनवर काय़
म्हणाली पत्नी नेहा धूपिया?