Rashmika Mandana Film | पुष्पा 2 मध्ये श्रीवल्लीचा रोल कापण्यात आला का, ‘या’ विशेष कारणामुळे सर्वत्र होतेय चर्चा

नवी दिल्ली : Rashmika Mandana Film | पुष्पाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, पुष्पा 2 चा मुहूर्त झाला आहे. दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांच्या टीमने चित्रपटाची कथा फायनल केली आहे, लोकेशन सापडले आहे, कलाकारांची निवड झाली आहे आणि शूटिंग सुरू होणार आहे. पण जर तुम्ही पुष्पा आणि श्रीवल्लीचे चाहते असाल, तर तिला सिक्वेलमध्येही मोठी भूमिका साकारताना बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल. मात्र सिक्वलमध्ये श्रीवल्लीची भूमिका पूर्वीपेक्षा छोटी असू शकते, अशी चर्चा आहे (Rashmika Mandana Film). कारण म्हणजे श्रीवल्लीची भूमिका साकारणार्‍या रश्मिका मंदाना हिला दिग्दर्शकाने तयार केलेल्या शूटिंगच्या पहिल्या शेड्यूलमध्ये बोलावण्यात आले नाही (Rashmika Mandana In Pushpa 2).

तिच राहिल पुष्याची स्टाईल

दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांची टीम रात्रंदिवस चित्रपटाच्या कामात गुंतलेली असल्याचे रिपोर्ट सांगतात. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेकंड पार्टसाठी सर्व कलाकारांची लुक टेस्ट झाली असून दिग्दर्शकाने सर्व काही आपल्या मनाप्रमाणे केले आहे. गेल्या आठवड्यात हैदराबाद येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये लुक टेस्टची अंतिम फेरी पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकर्सने पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुनच्या लूकमध्ये काय बदल केले आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे सांगितले जात आहे की पुष्पराजच्या लूकमध्ये फारशी छेडछाड करण्यात आलेली नाही आणि पहिल्या चित्रपटाप्रमाणेच तो ठेवण्यात आला आहे. जो थोडासा बदल केला आहे तो त्याच्या कपड्यांच्या स्टाईलमध्ये केला आहे आणि सुकुमार यामुळे खूश आहे. (Rashmika Mandana Film)

नवीन तारे आणि मौजमस्ती

चित्रपटाशी संबंधित सूत्रांनुसार, पुष्पा 2 मध्ये अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. अशा अनेक लोकांना चित्रपटात संधी मिळत आहे, जे पुष्पाचे चाहते आहेत आणि यापूर्वी कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत.
लवकरच पुष्पा 2 चे शूटिंग सुरु होणार आहे.
यामध्ये पुष्पा आणि त्याच्या गँगशी संबंधित लोकांचे सीन शूट केले जाणार आहेत.
शूटिंगचे हे पहिले शेड्यूल असेल. परंतु पहिल्या पार्टमध्ये श्रीवल्लीसोबत पुष्पाचे लग्न दाखवूनही रश्मिका मंदानाला या शेड्यूलमध्ये बोलावण्यात आलेले नाही.
सूत्रांनुसार, पहिल्या शेड्यूलमध्ये पुष्पा त्याच्या गँगसोबत मौजमस्ती करताना शूट करण्यात येणार आहे आणि या सर्वांवर एक गाणे चित्रित केले जाणार आहे.
यानंतर कथेचे सीन शूट करण्यास सुरूवात होईल.

Web Title :- Rashmika Mandana Film | rashmika mandana pushpa 2 film goodbye amitabh bachchan ranbir kapoor animal shooting in bollywood

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरच्या मेगाब्लॉकचे नियोजन

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून कोयत्याने वार करुन गुंडाचा युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न