Rashtriya Samaj Paksha | राष्ट्रीय समाज पक्षाची जनसुराज्य यात्रा 29 ऑगस्टला पुणे शहरात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rashtriya Samaj Paksha | राष्ट्रीय समाज पक्षाचा 20 वा वर्धापन दिन येत्या 29 ऑगस्ट 2023 रोजी साजरा होत आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेली देशव्यापी जनसुराज्य यात्रा याच दिवशी पुणे शहरात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण 12 लोकसभा मतदार संघात ही यात्रा असणार आहेत. जनसुराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात माढा लोकसभा मतदार संघातून 10 जुलै 2023 पासून झाली आहे. या पहिल्या टप्प्याचा समारोप येत्या 29 तारखेला गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी 4 वाजता होईल. राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत लाखो कार्यकर्ते जनसुराज्य यात्रेत व गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या 20 व्या वर्धापन दिनामध्ये सामील होणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते यांनी दिली. (Rashtriya Samaj Paksha)

यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव माऊली नाना सलगर म्हणाले की या
जनसुराज्य यात्रेत लाखो पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होणार असून वर्धापन देखील उस्थाहात साजरा होणार आहे. (Rashtriya Samaj Paksha)

यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर यांनी सर्व पुणे व पिंपरी -चिंचवड मधील कार्यकर्ते व पदाधिकारी ययांना जनसुराज्य यात्रेत सामील होण्याचं आवाहन केलं.

यावेळी पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते, माऊली नाना सलगर,
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने,पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजित पाटील,
अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष गणेश लोंढे, जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, संपर्क प्रमुख अंकुश देवडकर,
पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर, पुणे शहर संपर्क प्रमुख वैजनाथ स्वामी
व पिंपरी-चिंचवड मधील राष्ट्रीय समाज पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | ‘वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा निर्णय, पक्षात फूट पडलेली नाही’, शरद पवारांच्या नव्या गुगलीने राजकीय चर्चांना उधाण (व्हिडीओ)

Post Office | पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचे आता नवीन नियम, काय-काय बदलले, जाणून घ्या

25 August Rashifal : मेष आणि मिथुनसह या तीन राशीवाल्यांसाठी दिवस आहे खास, वाचा दैनिक भविष्य