Ration Card : रेशन कार्डसंबंधीच्या समस्येची ‘या’ नंबर्सवर करा तक्रार, पहा पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : रेशन कार्ड एक सरकारी कागदपत्र आहे, ज्याद्वारे सरकारी वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानातून गहू, तांदूळ इत्यादी बाजार भावापेक्षा कमी दरात खरेदी करता येते. परंतु, धान्य वितरण बाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. नेहमी दिसून येते की, रेशन डीलर कार्डधारकांना त्यांच्या कोट्यातील धान्य देण्यास टाळाटाळ करतात. जर तुम्हाला अशाप्रकारच्या एखाद्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही टोल-फ्री नंबरवर तक्रार करू शकता.

NFSA च्या वेबसाइटवर करू शकता तक्रार –
नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल (एमएफएसए) वर प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळा टोल-फ्री नंबर आहे. तुम्ही एनएफएसएची वेबसाइट https://nfsa.gov.in वर जाऊन तक्रार करू शकता. या वेबसाइटवर मेल द्वारे आणि फोन नंबरद्वारे तक्रार केली जाते. प्रत्येक राज्याला वेगवेगळा टोल-फ्री नंबर आहे. प्रत्येक राज्यात रेशन कार्ड बनवण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी आहे.

सरकारने भ्रष्टाचार कमी करणे आणि धान्य प्रणाली सुधारण्यासाठी तक्रार हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत, जेणेकरून सबसिडीचे रेशन गरीबांपर्यंत पोहचावे. केंद्र सरकार गरीब लोकांसाठी धान्याच्या साठेबाजीत सहभागी रेशन डिलरवर कारवाई करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. जर रेशन कार्ड धारकाला आपल्या कोट्यातील पूर्ण धान्य मिळत नसेल तर तो टोल-फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतो.

येथे पहा राज्यनिहाय तक्रार हेल्पलाइन नंबर
आंध्रप्रदेश – 1800-425-2977
अरुणाचल प्रदेश – 03602244290
आसाम – 1800-345-3611
बिहार- 1800-3456-194
छत्तीसगढ- 1800-233-3663
गोवा- 1800-233-0022
गुजरात- 1800-233-5500
हरियाणा – 1800-180-2087
हिमाचल प्रदेश – 1800-180-8026
झारखंड – 1800-345-6598, 1800-212-5512
कर्नाटक- 1800-425-9339
केरळ- 1800-425-1550
मध्यप्रदेश- 181
महाराष्ट्र- 1800-22-4950
मणिपुर- 1800-345-3821
मेघालय- 1800-345-3670
मिझोरम- 1860-222-222-789, 1800-345-3891
नागालँड- 1800-345-3704, 1800-345-3705
ओडीसा – 1800-345-6724 / 6760
पंजाब – 1800-3006-1313
राजस्थान – 1800-180-6127
सिक्किम – 1800-345-3236
तमिळनाडू – 1800-425-5901
तेलंगना – 1800-4250-0333
त्रिपुरा- 1800-345-3665
उत्तरप्रदेश- 1800-180-0150
उत्तराखंड – 1800-180-2000, 1800-180-4188
पश्चिम बंगाल – 1800-345-5505
दिल्ली – 1800-110-841
जम्मू – 1800-180-7106
काश्मीर – 1800-180-7011
अंदमान आणि निकोबार बेट – 1800-343-3197
चंदीगढ – 1800-180-2068
दादरा आणि नागरा हवेली आणि दमन, दीव – 1800-233-4004
लक्षद्वीप – 1800-425-3186
पुदुच्चेरी – 1800-425-1082