रवीना टंडन, भारती सिंह आणि फराह खान यांना उच्च न्यायालयाकडून मोठा ‘दिलासा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार रवीना टंडन, कॉमेडियन भारती सिंह आणि कोरियोग्राफर फरहान खान यांना हरियाणा हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता. भारती सिंह, रवीना टंडन आणि फरहा खान या तिघींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.

रिपोर्टनुसार आता पंजाब आणि हरियाणा कोर्टानं पंजाब पोलिसांना या सेलिब्रिटींविरोधात कारवााई न करण्याचे निर्देश दिले आहेत. या तीनही सेलिब्रिटींनी एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

जस्टिस सुदीप अहलूवालिया यांनी या प्रकरणी पंजाब सरकारला नोटीस जारी केली आहे. आता कोर्ट 25 मार्च रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी करणार आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, तिघींविरोधात अमृतसरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण ?
अजनाला ब्लॉकचे क्रिस्चियन फ्रंटचे प्रेजिडेंट सोनू जफर यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला होता की, भारतीनं ख्रिश्चन लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी फराह खानचा शो बॅकबेंचर्सच्या या एपिसोडचं फूटेजही जमा केलं होतं या तक्रारीत म्हटलं होतं की, फराह, रवीना आणि भारती यांनी मिळून त्यांच्या शोमध्ये ‘Hallelujah’ शब्दाची खिल्ली उडवली होती.