रवि शंकर प्रसाद म्हणाले – ‘5 वर्षात 1 अरब मोबाइल फोन, पाच कोटी लॅपटॉपचे उत्पादन करणार भारत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयटी मिनिस्टर रवि शंकर प्रसाद यांनी म्हटले आहे की, पुढील पाच वर्षात भारताचे 100 कोटी मोबाइल फोन, पाच कोटी टेलिव्हिजन सेट आणि पाच कोटी आयटी डिव्हाईस सारखे लॅपटॉप आणि टॅबलेटच्या प्रॉडक्शनचे टार्गेट आहे. देशात सध्या 4जी काम करत आहे आणि 5 जी चे टेस्टिंग लवकरच सुरू होणार आहे.

भारतीय उद्योग मंडळाच्या (सीआयआय) व्हर्च्युअल इव्हेंटला मंगळवारी संबोधित करताना प्रसाद म्हणाले, पुढील पाच वर्षात भारत एक अरब मोबाइल फोन, पाच कोटी टीव्ही सेट आणि पाच कोटी आयटी हार्डवेयर डिव्हाईस सारखे लॅपटॉप आणि टॅबलेटचे प्रॉडक्शन करणे सुरू करेल. हा पुढील पाच वर्षासाठी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचा दृष्टीकोन आहे.

डिजिटल अर्थव्यवस्था 1,000 अरब डॉलरपर्यंत पोहचवण्याचा उद्देश
रवि शंकर प्रसाद म्हणाले, आम्हाला पुढील पाच वर्षात देशाची डिजिटल अर्थव्यवस्था 1,000 अरब डॉलरवर पोहचवायची आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए) नुसार धाराणात्मक हस्तेक्षेपाने भारत आपली लॅपटॉप आणि टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगची क्षमता 2025 पर्यंत 100 अरब डॉलरवर पोहचवू शकतो.