Ravikant Tupkar | रविकांत तुपकरांचा जामीनअर्ज न्यायालयाने स्विकारला; उद्या सुनावणीची शक्यता…

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, तुपकर यांच्या वकिलांची जामिनासाठीची नोटीस न्यायालयाने स्विकारली असून यावर सरकारी पक्षाला आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडून नोटीस देखील पाठविण्यात आली आहे. जर सरकारी पक्षाकडून नोटीशीनुसार म्हणण मांडण्यात आलं तर, तुपकरांच्या (Ravikant Tupkar) जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मात्र, जर सरकारी पक्षाकडून आपलं म्हणणं आज मांडल गेलं नाही तर ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. रविकांत तुपकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविकांत तुपकर मात्र अन्नत्याग आंदोलनावर ठाम असून त्यांनी मागील तीन दिवसांपासून जेवन केलेले नाही. त्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले आहेत.

शनिवारी रविकांत तुपकर यांचे आंदोलक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकरांनी कापूस, सोयाबीन आणि पीकविम्याच्या प्रश्नांवरुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांकडून तुपकर यांचा शोध सुरु होता. आंदोलनाचा इशारा देऊन तुपकर (Ravikant Tupkar) भूमिगत झाले होते.

शनिवारी (११ फेब्रुवारी) तुपकर येण्याआधीच शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते.
तुपकर पोलिसांच्या वेशात येताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा गदारोळ झाला आणि पोलिसांची धावपळ उडाली.
तुपकरांना आत्मदहनापासून रोखल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ते आंदोलनला बसले होते.
त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली होती.
अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

Web Title :-  Ravikant Tupkar | court accepted ravikant tupkar bail application

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Weather News | पुण्यात पुन्हा वाढला गारठा; किमान तापमान गेले सिंगल डिजिटमध्ये, आल्हाददायक वातावरणाचा अनुभव

Nagpur Crime News | पाण्याच्या टाकीत पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Balasaheb Thorat | राधाकृष्ण विखेंच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…