Ravindra Dhangekar | 4 अपक्ष उमेदवारांचा रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा; वडगावशेरी मतदार संघात कॉंग्रेस आणखी मजबूत

एमआईएमच्या माजी नगरसेविकेचा शेकडो कार्यकर्तांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश; वर्तमान परिस्थितीमध्ये कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही : अश्‍विनी लांडगे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar | राजकारणाची पातळी अत्यंत खराब झाली आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळेच वर्तमान परिस्थितीमध्ये कॉंग्रेस शिवाय अन्य दूसरा कोणताही योग्य पर्याय नाही, असे प्रतिपादन एमआईएमच्या माजी नगरसेविका अश्‍विनी लांडगे (Ashwini Landge) यांनी आज केले.

कॉंग्रेस भवन येथे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये एमआईएमच्या पुणे मनपाच्या माजी नगरसेविका व समाज सेवक डॅनियल लांडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, नागपुर पदवीधर क्षेत्राचे आमदार अभिजीत वंजारी, चंद्रपूरचे जिला कॉंग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, प्रचार प्रमुख मोहन जोशी, सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ता गोपाळ तिवारी, प्रसार माध्यम समन्वयक राज अंबिके व अन्य उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे निवडणुकीच्या ६ दिवस आधी एमआईएमला मोठा धक्का बसला आहे तसेच कॉंग्रेस पक्षाची वडगावशेरी मतदार संघात ताकत आणखी वाढली आहे. (Ravindra Dhangekar)

यासोबतच ४ अपक्ष उमेदारांनी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये सुरेशकुमार ओसवाल, डॉ. सलीम बागबान, किरण रायकर आणि सलीम सय्यद यांचा समावेश आहे. त्यांनी म्हंटले आहे की, सद्य परिस्थिती मध्ये लोकशाही व्यवस्था आणि सर्व स्वायत्त संस्थांची स्वायत्तता टिकणे अतिशय महत्वाचे आहे तसेच आमच्या उमेदवारीमुळे भाजप महायुती विरुद्धच्या मतांचे विभाजन होऊन भाजप उमेदवार निवडून येण्याचा धोका वाटतो. सदर बाब लक्षात घेऊन आम्ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विनशर्त पाठींबा देत आहोत. तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आझाद समाज पार्टी आणि राष्ट्रीय दलित पँथर यांनीही उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठींबा दिला आहे. (Pune Lok Sabha)

यावेळी अश्‍विनी लांडगे म्हणाल्या कि सध्या वातावरण अत्यंत प्रदूषित आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी ही निवडणुक अत्यंत महत्वाची आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची कॉंग्रेसची विचारधाराच देशाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळेच भविष्याचा विचार करून सर्व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गेले ५ वर्ष एमआईएममध्ये काम केले आहे, मात्र वर्तमान परिस्थितीचा विचार करून संविधान वाचविण्यासाठी मतांची विभागणी होऊ नये, सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. आम्ही ग्राउंड लेवलवर काम करत आहोत, त्यामुळे लोकांचा कल व नागरिकांची अपेक्षा लक्षात घेऊनच महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संविधानाने आपल्याला दिलेली ताकत कायम रहावी म्हणून प्रयत्न करणार आहे. या निवडणुकीत रविंद्र धंगेकरच विजयाचा झेंडा फडकवितील असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | दोन लाख पुणेकरांनी घेतल्या ‘व्होटिंग स्लिप’; मोहोळ यांच्या प्रभावी यंत्रणेचा नागरिकांना फायदा

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांनी दिले चोख प्रत्युत्तर, ”शरद पवार मुद्दाम आजारी पडले, हा अजितदादांचा विचार हास्यास्पद”

Solapur Lok Sabha | धक्कादायक! सोलापुरात मतदाराने पेट्रोल टाकून जाळली EVM मशीन, घटनेनंतर बंदोबस्त वाढवला (Video)

Murlidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर – मुरलीधर मोहोळ