Solapur Lok Sabha | धक्कादायक! सोलापुरात मतदाराने पेट्रोल टाकून जाळली EVM मशीन, घटनेनंतर बंदोबस्त वाढवला (Video)

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Solapur Lok Sabha | सोलापुरमध्ये एका मतदाराने मतदान करण्याऐवजी ईव्हीएम मशीनवर (EVM Machine) पेट्रोल टाकून ती जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. नवीन मशीन आणण्यासाठी निवडणूक प्रशासनाची धावपळ उडाली. सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे हा ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रकार घडला आहे. सदर व्यक्तीने इव्हीएम जाळण्याचा प्रयत्न का केला याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.(Solapur Lok Sabha)

सांगोला (Sangola) तालुक्यातील बागलवाडी येथे शांतपणे मतदान प्रक्रिया सुरू होती.
यावेळी एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ही आग ताबडतोब विझवण्यात आली.
यामध्ये ईव्हीएम मशीनचे थोडे नुकसान झाले. यानंतर काही काळ मतदान प्रक्रिया बंद पडली होती.

दरम्यान, सांगोला येथील सहायक्क निवडणूक निर्णय अधिकारी यांना घटनेबाबत अधिक माहितीसाठी विचारले असता
त्यांनी बोलण्यास नकार दिला. नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाला पुन्हा सुरुवात झाली. घटनेनंतर बागलवाडी मतदान केंद्रावरील बंदोबस्त वाढवण्यात आला.

सोलापूर व माढा लोकसभेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. सकाळी ८ वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी बारा टक्के तर माढा लोकसभेसाठी दहा टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदार प्रणिती शिंदे
(Praniti Shinde) उमेदवार आहेत. तर माढा मतदारसंघात (Madha Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार
धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baramati Lok Sabha | ईव्हीएमवर कमळंच नव्हते, पारंपारिक मतदार असलेले आजोबा भडकले, पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावरील प्रकार (Video)

Baramati Lok Sabha | आरोप-प्रत्यारोप, विखारी टीका, आता सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल, कार्यकर्ते, मतदारांवर कोणता परिणाम होणार, चर्चेला उधाण!

Dattatray Bharne | शिवीगाळ प्रकरणावर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण, मी मराठीत बोललो, शिवीगाळ केली नाही, तक्रारीला कायदेशीर…

Baramati Lok Sabha | आमदार दत्तात्रय भरणेंनी केली सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ, आपबिती सांगताना नाना गवळी ढसाढसा रडले (Video)