Ravindra Dhangekar | जेष्ठ नागरिक संघातर्फे रवींद्र धंगेकरांचा प्रचार सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) पुणे लोकसभा मतदार संघातील (Pune Lok Sabha) काँग्रेस पक्षाचे (Congress Candidate) उमेदवार आ. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा प्रचार करण्याचे पुणे शहर काँग्रेस जेष्ठ नागरिक संघातर्फे बैठकीत एकमताने ठरवण्यात आले.

त्यानुसार संघटनेचे २००० हुन अधिक जेष्ठ नागरिक घरोघरी प्रचार पत्रके वाटायचे व रवींद्र धंगेकरांना निवडून आणण्याचे आवाहन करीत आहेत. संघटनेचे अध्यक्ष द.स. पोळेकर यांच्या पुढाकाराने ही प्रचार मोहीम सुरु झाली आहे. संघटनेचे कायदा सल्लागार बाळासाहेब बाणखेळे यांनी प्रचाराची रुपरेखा आखली असून या संदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi Congress) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, रवींद्र धंगेकर यांचा पिंड कार्यकर्त्याचा आहे. ते जनतेचे नेते आहेत त्यांना मत म्हणजे पुण्याच्या विकासाला मत हे घरोघरी जाऊन सांगावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.(Ravindra Dhangekar)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe – Shivajirao Adhalrao Patil | निवडणूक प्रचारात कोल्हे-आढळराव आमनेसामने ! हरिनाम सप्ताहात आढळरावांनी ऐकलं डॉ. कोल्हेंच संपुर्ण भाषण

Murlidhar Mohol | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेपूर्वी मुरलीधर मोहोळ म्हणाले, येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी…