Ravindra Dhangekar | विविध संस्था-संघटनांचा रवींद्र धंगेकरांना पाठिंबा

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar | पुणे लोकसभा निवडणुकीत (Pune Lok Sabha) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे काँग्रेस (India Aghadi Congress Candidate) पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विविध संस्था-संघटनांनी पाठिंबा दिला आहे.(Ravindra Dhangekar)

‘उत्तर भारतीय एकता मंच’चे पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज यादव यांनी पत्रात म्हटले आहे की, महाविकास आघाडीच या देशाला स्थिर सरकार देऊ शकते व भारतीय संविधानाचे संरक्षण करू शकते. तसेच लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम महाविकास आघाडीच करू शकते. या देशातील सर्व जाती-जमातींच्या लोकांचा सर्वांगीण सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास करू शकते. त्यासाठी उत्तर भारतीय एकता मंच उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देत आहे.

‘शिवसंग्राम फाउंडेशन;चे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष तुषार काकडे यांनी पत्रकात म्हंटले आहे कि, मराठा समाजाची अपेक्षा मराठा आमदार अथवा खासदारांची संख्या वाढवणे ही नसून मराठा समाजाचे प्रश्न सोडवतील, त्यांच्या पाठीशी थांबतील असे लोकप्रतिनिधी संसदेत पाठवणे ही आहे. आजवर आपण मराठा समाजाला कायम समर्थन दिलेत व यापुढेही ते कायम राहील या अपेक्षेसह आपल्याला जाहीर व सक्रिय पाठिंबा देत आहोत.

‘पुणे डायसेस (सीएनआय)’चे बिशप राईट रेव्हरंट अँड्र्यूज राठोड यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ख्रिश्चन समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, श्रीमती प्रतिभा धंगेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस हॅरॉल्ड विल्सन मॅसी यांनी केले.

‘रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे’ संस्थापक अध्यक्ष राम डंबाळे यांनी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय संविधान बळकट करण्यासाठी आम्ही व आमचे कार्यकर्ते उमेदवार रवींद्र धंगेकर यांना निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

‘ऑल इंडिया जमाअ-ए-सलमानी ट्रस्ट’चे अध्यक्ष सलीम शेख यांनी पत्रकात म्हटले आहे की रवींद्र धंगेकर समाजात करत असलेले काम पाहता पुढील काळात पुणे शहराच्या विकासासाठी त्यांच्या सारखे नेतृत्व खासदार म्हणून संसदेत पुण्यासाठी खूप काही करू शकते. यासाठी आमच्या ट्रस्टच्या वतीने रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभा निवडणूक २०२४ साठी बिनशर्त पाठींबा जाहीर करत आहोत.

‘अंबुज पार्टी ऑफ इंडिया (एपीआय)’चे महाराष्ट्र उपाध्यक्ष बन्सी गाडे आणि राज्य प्रवक्ते रावसाहेब भाऊसाहेब साळवी यांनी पत्रकात म्हटले आहे की पार्टीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश वायदंडे व पुणे लोकसभा विभागातील मातंग समाजाच्या मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या निर्णयानुसार आम्ही रवींद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी जाहीर पाठींबा देत आहोत.

‘भीमशक्ती संस्थे’तर्फे पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्रचे युवक अध्यक्ष विजय हिंगे व पुणे शहरचे युवक अध्यक्ष अजय जानराव यांनी पत्रकात म्हटले आहे की, भीम शक्तीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार भीम शक्ती संघटनेचे पुणे शहरातील संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना या लोकसभेच्या निवडणुकीत जाहीर पाठींबा देत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur-Pune Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास बंदी

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ! पात्र मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे- दीपक सिंगला