RBI Alert | जुनी नाणी किंवा नोटांची विक्री करण्यापूर्वी व्हा सावध, RBI ने जारी केली महत्वाची सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  RBI Alert | मागील काही दिवसांपासून जुनी नाणी आणि नोटांच्या (RBI Alert for Old Note and Coin Buying and selling) खरेदी आणि विक्रीबाबत अनेक वृत्त समोर येत आहेत. लोक विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे जुन्या नोटा आणि नाणी विकत आहेत. याबाबत RBI ने नुकतीच एक सूचना जारी केली आहे.

RBI ने सावध करत म्हटले आहे की, काही फसवणूक करणारी तत्व ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीसाठी केंद्रीय बँकेच्या नावाचा आणि लोगोचा वापर करत आहेत.

जर तुम्हीसुद्धा जुनी नाणी आणि नोटा विकणे किंवा खरेदीच्या तयारीत असाल तर सावध व्हा.
ऑनलाइन फसवणूक करणारे लोक सातत्याने ग्राहकांना चूना लावण्याच्या प्रयत्नात आहेत.
यासाठी ते रोज नवनवीन पद्धत शोधून काढतात. कारण फसवणूक करणारे हे लोक जुनी नाणी आणि नोटा विकण्यासाठी लोकांकडून शुल्क, किंवा टॅक्स मागत आहेत.

RBI ने ट्विटमध्ये काय म्हटले…

रिझर्व्ह बँकेने आपल्या वक्तव्यात स्पष्ट म्हटले आहे की, आरबीआय अशाप्रकारच्या हालचालींमध्ये
सहभागी नाही आणि अशाप्रकारच्या ट्रांजक्शनसाठी कुणाकडून कोणतेही शुल्क किंवा कमिशन
सुद्धा कधी मागितले जाणार नाही.
आम्ही कोणतीही संस्था किंवा व्यक्तीला अशाप्रकारच्या कामासाठी कोणतेही अधिकार दिलेले नाहीत.

RBI सोबत कुणाचीही नाही डील

भारतीय रिझर्व्ह बँक अशाप्रकारच्या प्रकरणात डील करत नाही आणि कधीही कुणाकडून शुल्क किंवा कमिशन मागत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने एखादी संस्था, कंपनी किंवा व्यक्तीला अशाप्रकारच्या ट्रांजक्शनवर बँकेच्या वतीने शुल्क किंवा कमीशन घेण्यासाठी कोणतीही अथॉरिटी दिलेली नाही.
भारतीय रिझर्व्ह बँक सामान्य लोकांना अशाप्रकारच्या बनावट आणि फसवणूक करणार्‍या ऑफर्समध्ये न फसण्याचा सल्ला देत आहे.

 

Web Title : RBI Alert | be careful if you online buy and sell old coins notes rbi issues notice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | धक्कादायक ! रक्षाबंधनासाठी पत्नीला माहेरी घेऊन गेलेल्या पतीचा प्रियकरानंच काढला काटा

Pune Crime | शेतात गाय बांधल्‍यावरून सख्ख्या चुलत भावात तुंबळ मारामारी; आईचा मृत्‍यू

LIC Jeevan Shanti Yojana | एलआयसीची ‘ही’ पॉलिसी आयुष्यभर करून देईल कमाई, जाणून घ्या कशाप्रकारे मिळतील फायदे