RBI नं ‘या’ मोठया बँकेला ठोठावला तब्बल 10 कोटींचा दंड, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रिझर्व्ह बँक(Bank) ऑफ इंडियाने (RBI) देशातील सर्वात मोठी खासगी बँक(Bank) म्हणून ओळख असलेल्या HDFC बॅंकेला तब्बल 10 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 6 (2) आणि कलम 8 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकारल्याचे सांगितले जात आहे. नियामक अनुपालनातील अनियमिततेमुळे ही कारवाई केल्याचे RBI ने सांगितले आहे.

Maharashtra Weather : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पुढील 3 तासात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

HDFC बँकेच्या वाहन कर्ज पोर्टफोलिओमध्ये काहीतरी गडबड झाल्याबद्दल एका व्हिसलब्लोअरने RBI कडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारावर RBI कडून थर्ड पार्टी नॉन फाइनेंशियल प्रोडक्ट्स-आर्थिक उत्पादनांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. या तपासात काही त्रुटी आढळल्या. या प्रकरणी RBI ने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. रिझर्व्ह बँकेने बजावलेल्या नोटिसीला HDFC कडून उत्तर देण्यात आले. मात्र, या उत्तरावर RBI चे समाधान झाले नाही. त्यामुळे शेवटी तपासादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्याने HDFC बँकेला 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एका अहवालानुसार, बँक ग्राहकांना वाहन कर्ज मंजूर करताना पारदर्शक व्यवहार करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारवाईचं पाऊल उचलावे लागल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

 

धक्कादायक ! Covid-19 संसर्गाच्या तुलनेत बुरशीजन्य आजारांनी अधिक मृत्यू

Coronavirus : गुळण्या करून ‘कोरोना’ चाचणी, ICMR कडून RT-PCR च्या नव्या पद्धतीला मंजूरी

Video : IPL 2021 साठी UAE ला जाण्यासाठी तयार Chahal ची पत्नी Dhanashree, डान्स व्हिडिओ वायरल

किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचले, म्हणाले – ‘आगे आगे देखो होता है क्या…’