RBI New Guideline on Bank Lockers | बँक लॉकरसाठी RBI ची नवीन गाईडलाईन, चोरी झाल्यास 100 पट मिळेल भरपाई; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  RBI New Guideline on Bank Lockers | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या लॉकरबाबत बुधवारी नवीन गाईडलाईन (RBI New Guideline on Bank Lockers) जारी केली असून ती 1 जानेवारी 2022 पासून प्रभावीपणे लागू होईल. ही गाईडलाईन नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांना (new and old customers) लागू होईल ज्यांनी बँकेत लॉकर सुविधा घेतली आहे.

आरबीआईने केले पुनरावलोकन (Review by RBI)

आरबीआयने लॉकर सुविधेचे पुनरावलोक केले तसेच भारतीय बँक असोसिएशन आणि बँकांचा फीडबॅक ऐकल्यानंतर नवीन गाईडलाईन जारी करण्याचा निर्णय घेतला.

आरबीआयची नवीन गाईडलाईन (RBI’s new guideline)

बँकेत आग लागणे, चोरी होणे, इमारत कोसळणे, कर्मचार्‍याकडून फसवणूक इत्यादी स्थितीत बँकेला ग्राहकांना त्यांच्या लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट भरपाई द्यावी लागेल.
म्हणजे वार्षिक 10 हजार भाडे असेल तर बँकेला 10 लाख रुपये भरपाई द्यावी लागेल.

प्रतिबंधित सामान ठेवू नये (Restricted luggage should not be kept in locker)

लॉकर सुविधा देताना करारात हे ठरवून घ्यावे की लॉकरमध्ये प्रतिबंधित सामान, बेकायदेशीर सामान किंवा नुकसानकारक सामान ठेवले जाणार नाही.

लॉकर उपलब्धतेची माहिती द्यावी (Locker availability should be informed)

बँकेच्या प्रत्येक शाखेनुसार, तिथे किती लॉकर उपलब्ध आहे त्याची माहिती कोअर बँकिंग सिस्टमद्वारे उपलब्ध करावी किंवा त्याऐवजी एखादा दुसरी एैच्छिक ऑनलाइन व्यवस्था करावी.

सविस्तर रिसिट ग्राहकाला द्यावी (Detailed receipt for customer)

हे ठरवावे की, ही सुविधा बँकेची सायबर सिक्युरिटी लक्षात घेऊन करावी.
बँकेने लॉकर सुविधा घेणार्‍या ग्राहकाला कोणता लॉकर दिला आहे इत्यादीची ग्राहकाला नमूद केलेली रिसिट द्यावी.
तसेच जे ग्राहक वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनाही रिसिट द्यावी की त्यांचा नंबर कधी येईल.

 

नैसर्गिक आपत्तीमध्ये भरपाई नाही (There is no compensation in a natural disaster)

जर नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर, विज पडणे, वादळ इत्यादीने नुकसान झाले तर भरपाई मिळणार नाही असे स्पष्ट नमूद करावे.

सुरक्षेची व्यवस्था चोख करावी (Security should be tight)

याशिवाय जर ग्राहकाच्या चुकीने लॉकरचे काही नुकसान झाले तरीसुद्धा बँक भरपाई करणार नाही.
परंतु बँकेला हे ठरवावे लागेल की, बँकेच्या इमारतीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही अणि सुरक्षेची व्यवस्था चोख करावी.

तीन वर्षांचे अ‍ॅडव्हान्स भाडे द्यावे लागेल 

बँकांना अधिकार असेल की ग्राहकाकडून एकरकमी तीन वर्षाचे अगाऊ भाडे त्या घेऊ शकतात.
जर ग्राहकाने लॉकर तोडले तर या स्थितीत या रक्कमेतून भरपाई वसूल केली जाऊ शकते.
सध्याच्या ग्राहकांना तीन वर्षाचे पैसे देण्याची आवश्यकता नाही, बँकेला तशी परवानगी नाही.

परत करावे लागेल अ‍ॅडव्हान्स भाडे 

जर ग्राहकाने लागोपाठ तीन वर्षापर्यंतचे भाडे दिले नाही तर बँक लॉकर तोडू शकते.
जर लॉकरचे भाडे अ‍ॅडव्हान्स घेतले असेल तर लॉकर सरेंडर करतेवेळी बँकेला अ‍ॅडव्हान्समध्ये घेतलेली रक्कम ग्राहकांना परत करावी लागेल.

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Health Tips | दिवसा नव्हे, रात्री अंघोळ केल्याने होतात जबरदस्त फायदे; निद्रानाश, अ‍ॅलर्जी, मसल्स क्रॅम्पपासून मिळतो दिलासा

IRCTC | फिरायला जायचे असेल तर लवकर बुक करा IRCTC चे ‘हे’ पॅकेज, मिळतेय विमान प्रवासाची मजा; जाणून घ्या

PNB ग्राहकांसाठी खुशखबर ! 30 सप्टेंबरपर्यंत लोनवर लागणार नाही प्रोसेसिंग फी, डॉक्युमेन्टेशन चार्जसुद्धा पूर्णपणे माफ