RBI New Guideline on Credit-Debit Card | बँकांची मनमानी रोखण्यासाठी RBI चा मोठा निर्णय ! क्रेडिट-डेबिट कार्डबाबत नवी नियमावली जारी, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – RBI New Guideline on Credit-Debit Card | वेळोवेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India) कठोर पावले उचलली जातात. अशाच पद्धतीने आरबीआयने एक नवी नियमावली जारी केली आहे. क्रेडिट कार्ड (Credit Card) कंपन्यांची मनमानी रोखण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. क्रेडिट कार्ड जारी करताना, बँका ग्राहकांना त्याच्या फीचर्सबद्दल अतिशय मोहक पद्धतीने माहिती देतात, तर कार्डच्या पेमेंटवर व्याज आणि इतर शुल्क (Credit Card Charges) यांची माहिती दिली जात नाही. परंतु, आता आरबीआयने कार्डशी संबंधित प्रत्येक शुल्क पारदर्शक करण्यासाठी, ग्राहकांचे हित आणखी मजबूत करण्यासाठी याबाबत (RBI New Guideline on Credit-Debit Card ) निर्णय घेतला आहे.

 

बँका (Banks) ग्राहकांच्या संमतीशिवाय क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाहीत. त्याचबरोबर, क्रेडिट कार्ड अपग्रेड केल्यास अथवा ग्राहकाला न विचारता खरेदी मर्यादा वाढवल्यास बँकेला दंड होऊ शकतो. क्रेडिट कार्डसह इतर ऑफर देऊ शकत नाहीत. सेंट्रल बँकेच्या (Central Bank) नव्या क्रेडिट कार्ड नियमांनुसार, क्रेडिट अथवा डेबिट कार्ड जारी करण्यापूर्वी, बँका त्यांच्या ग्राहकांना कार्डवरील व्याजासह इतर सर्व प्रकारच्या शुल्कांची माहिती अनिवार्यपणे देतील. असं आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (RBI Guidelines) सांगितलं आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहेत. (RBI New Guideline on Credit-Debit Card)

 

क्रेडिट कार्डच्या थकबाकीच्या भरणे बाबत ग्राहकांना ईमेल अथवा SMS द्वारे माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर पैसे भरण्यासाठी कमीतकमी 15 दिवसांचा अवधी दिला जाईल. त्यानंतर त्यांना दंड होऊ शकतो. या नियमाचे पालन न केल्यास, क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्याला बिलाच्या दुप्पट दंड भरावा लागणार आहे.

दरम्यान, मध्यवर्ती बँकेच्या (Central bank) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता ग्राहकांना थकित बिल भरण्यासाठी धमकावता येणार नाही.
क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्याने कोणत्याही ग्राहकाला धमकवल्यास त्याची तक्रार मध्यवर्ती बँकेच्या लोकपालाकडे केली जाऊ शकते.
तसेच, नवीन नियमानुसार क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका ग्राहकांना सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेतच कॉल करू शकतात.
या दरम्यान आता ग्राहकाची माहिती इतर कोणत्याही पक्षाशी शेअर करण्यासही मनाई असल्याचे मार्गदर्शक तत्त्वानुसार सांगितले आहे.

 

Web Title :- RBI New Guideline on Credit-Debit Card | reserve bank of india rbi new guideline on credit card issuer from 1 july

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा