RBI मध्ये नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 200 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. RBI ने ग्रेड बी (डीआर) जनरल ऑफिसर, ग्रेड बी (डीआर) डीईपीआर, ग्रेड बी (डीआर) डीएसआयएम या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 
 
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची तारीख – 21 सप्टेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 11 ऑक्टोबर 2019
 
पदांचे नाव आणि पद संख्या –
ग्रेड बी (डीआर) जनरल ऑफिसर  – 156
ग्रेड बी (डीआर) डीईपीआर – 20
ग्रेड बी (डीआर) डीएसआयएम – 23 
 
वयोमर्यादा –
या पदांसाठी किमान वय 21 वर्ष असणे आवश्यक आहे. तर अधिक वय 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक 
 
शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी उमेदवारींची शैक्षणिक योग्यता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन नीट वाचावे.
 
परिक्षा शुल्क –
एससी, एसटी आणि पीडब्यूडी उमेदवारांसाठी परिक्षा शुल्क 100 रुपये असेल.
जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 850 रुपये शुक्ल असेल.
 
अर्ज प्रक्रिया –
यासाठी  RBI च्या आधिकृत वेबसाइटवर जावे. सर्व माहिती वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर 2019 पर्यंत असेल. हे अर्ज तुम्ही ऑनलाइन भरु शकतात. 

 

Visit : Policenama.com

You might also like