RBI Rules | 50 हजारपेक्षा जास्तीचा चेक देणे ठरू शकते अडचणीचे; जाणून घ्या काय आहे RBI चा नवीन नियम?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था RBI Rules | जर तुमच्याकडे बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग (Internet Banking) ची सुविधा नसेल, तर 50,000 रुपयांपेक्षा जास्तच्या मूल्याचा चेक जारी करणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टम (PPS) लागू करण्यास सुरू केले आहे. बहुतांश बँका positive pay system 1 सप्टेंबरपासून (RBI Rules) लागू करतील.

रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चेक ट्रांजक्शन सिस्टम (CTS) साठी ऑगस्ट 2020 मध्ये पॉझिटिव्ह पे सिस्टमची घोषणा केली होती.
या नियमानुसार, बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी त्यांच्या इच्छेनुसार 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्तीची रक्कम असलेल्या चेकसाठी ही सुविधा लागू करू शकतात.

चेक होईल रिजेक्ट

आरबीआयच्या या नियमांतर्गत चेक जारी करण्यापूर्वी तुम्हाला बँकेला याबाबत माहिती द्यावी लागेल अन्यथा चेक स्वीकारला जाणार नाही. तुमचा चेक रिजेक्ट होईल.
मात्र, या नियमाने त्या ज्येष्ठ नागरिकांना अडचण येऊ शकते,
जे नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिेंगची सेवा वापरू शकत नाहीत.

या बँकांनी लागू केले नियम

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) सह काही बँकांनी 50 हजारपेक्षा जास्तीच्या चेकसाठी PPS अनिवार्य केले आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना बँकेला नेट/मोबाइल बँकिंग किंवा शाखेत जाऊन चेक डिटेल्स द्याव्या लागतील. भारतीय स्टेट बँक (एसबीआय), कोटक महिंद्रा बँकेने सुद्धा पॉझिटिव्ह पे सिस्टम 50 हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या चेकसाठी लागू केले आहे.
सध्या या बँकांनी ग्राहकांसाठी यास एैच्छिक ठेवले आहे.

 

Web Title : RBI Rules | high value cheque may be rejected sans net mobile banking or branch visit check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात पोलिस अधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा, प्रचंड खळबळ

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाल्या…

Pune Railway Police | प्रवाशांचे मोबाईल चोरणारा सराईत चोर लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात, 4 गुन्हे उघडकीस