RBI UDGAM Portal | बॅंकेमध्ये दावा न केलेली रक्कम आता एकाच वेबसाईटवर पाहता येणार; आरबीआयने केले खास पोर्टल लॉन्च
पोलीसनामा ऑनलाइन – RBI UDGAM Portal | बॅंकेतील अकाऊंट आणि त्यातील पैशासाठी वारसदार लावणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण तसे न केल्यास बॅंकेकडे कोणीही हक्क न दाखवलेली रक्कम जमा होत राहते. आत्ता अनेक बॅंकांमध्ये असा दावा न केलेला पैसा (Bank Unclaimed Money) आहे. मात्र नागरिकांच्या सोयीकरिता आपले बॅंकेमध्ये अनक्लेम्ड पैसे (Unclaimed Savings) अडकले असल्यास, त्याची माहिती मिळवण्यासाठी वेबसाईट चालू करण्यात आली आहे. भारतीय रिजर्व बॅंकेतर्फे (Reserve Bank of India) नागरिकांच्या सुख सोयींकरिता अनेक पोर्टल, ॲप, योजना घोषित केल्या जातात. त्याचप्रमाणे आता अनक्लेम्ड पैशांची माहिती लोकांना देण्याकरिता केंद्रीकृत वेब पोर्टल उदगम (UDGAM) पोर्टल लाँच करण्यात (RBI UDGAM Portal) आले आहे. याच्या मदतीने दावा न केलेली रक्कम शोधता येणार आहे.
भारतीय रिजर्व बॅंकेतर्फे (RBI) लॉन्च करण्यात आलेल्या या पोर्टलमुळे विविध बॅंकेमध्ये वारसदार नसलेले पैसे आणि त्याची अधिकची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. या पोर्टलवर अनेक लोकांना त्यांचे अनक्लेम्ड पैसे पाहता येणार आहे. दरवर्षी बॅंकेतर्फे दावा न केलेल्या ठेवींची यादी त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते. मात्र अनेक नागरिक व खातेदार याबाबत अनभिज्ञ असतात. सर्वांना एकाच वेबसाईटवर सगळ्या बॅंकेची दावा न केलेली रक्कम पाहता यावी यासाठी हे नवे UDGAM पोर्टल लाँच करण्यात आले आहे. लाभार्थींसाठी हा एक सोयीस्कर मार्ग उपलब्ध झाला आहे. या ऑनलाइन वेबसाईटच्या मदतीने योग्य इनपुट टाकल्यानंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी पाहता येणार आहे.
देशातील अनेक बॅंकांमध्ये अशी दावा न केलेली सेव्हिंग अकाऊंट (Savings Account) व एफडीची (FD) ठेवी करोडो रुपयांमध्ये आहे. याची माहिती बॅंकेला रिजर्व बॅंकेला द्यावीच लागते. अशावेळी या ठेवीचे योग्य निराकरण करण्यासाठी यावर्षी 2023 मध्ये RBI ने या प्रकारच्या पोर्टलची घोषणा केली होती. त्याप्रमाणे हे UDGAM पोर्टल आले असून सुरुवातीला काही बॅंकेचा डेटा यामध्ये पाहता येणार आहे. यामध्ये सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI), धनलक्ष्मी बँक (Dhanlaxmi Bank Ltd), साउथ इंडियन बँक (South Indian Bank Ltd), डीबीएस बँक इंडिया (DBS Bank India Ltd) आणि सिटी बँक (Citi Bank) इत्यादी बॅंकांमधील हक्क नसलेल्या ठेवींबद्दल माहिती सध्या पोर्टलवर उपलब्ध आहे. उर्वरित इतर बॅंकांचा डेटा देखील लवकरच पोर्टलवर अपलोड केला जाणार आहे.
अनेक बॅंकामध्ये करोडो रुपयांमध्ये दावा न केलेल्या ठेवी आहेत. या ठेवी सेव्हिंग अकाऊंट आणि फिक्स्ड डिपॉझिट
(Fixed Deposit) स्वरुपात आहे. 2023 पर्यंत, सुमारे 35,000 कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी आरबीआयकडे
हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. हे पैसे अशा खात्यांचे आहेत जे मागील 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ
वापरात नाहीत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडे सर्वाधिक 8,086 कोटी रुपयांची दावा न केलेली रक्कम आहे.
तसेच पीएनबीमध्ये (PNB) 5,340 कोटी रुपये, कॅनरा बँकेत (Canara Bank) 4,558 कोटी रुपये आणि
बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) 3,904 कोटी रुपये हक्क नसलेले आहेत.
या ठेवींचा आकडा समोर येताच त्यांचे गांभीर्य लक्षात घेत आरबीआयने हे नवे UDGAM पोर्टल लाँच केले आहे.
यावरुन (RBI UDGAM Portal) सध्या उपलब्ध 7 बॅंकेतील दावा न केलेल्या ठेवींच्या डिटेल पाहता येणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा